अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूकपदवीधर उमेदवारांनी नमुना 18 मध्ये 7 नोव्हेंबरपर्यंत पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडे सादर करा
अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक पदवीधर उमेदवारांनी नमुना 18 मध्ये 7 नोव्हेंबरपर्यंत पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडे सादर करा वाशिम, दि. 18 (जिमाका) : अमरावती पदवीधर मतदार संघाचे विधान परिषद सदस्य यांची मुदत 7 फेब्रुवारी 2023 रोजी संपत आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2024 च्या अनुषंगाने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरू झाला आहे. 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत पदवीधर मतदारसंघासाठी मतदार यादीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषीत केला आहे. पदवीधर मतदारसंघाच्या मतदार याद्या प्रत्येक निवडणुकीपूर्वी नव्याने तयार करणे आवश्यक असल्याने पात्र पदवीधरांना 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत विहीत नमुना 18 मध्ये पदनिर्देशीत अधिकाऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रे सादर करावी. या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत विभागीय आयुक्त, अमरावती हे मतदार नोंदणी अधिकारी असून सहायक मतदार नोंदणी अधिकारी जिल्हाधिकारी, वाशिम हे आहेत. मतदार नोंदणीचे अर्ज...