Posts

#एकतादिवस२०२५#EktaDiwas2025#RunForUnity

Image
सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात, "प्रत्येक भारतीयाने तो राजपूत, शीख किंवा जाट आहे हे विसरून जावे - तो भारतीय आहे." एकता दिवस दरम्यान एक भारतीय म्हणून आपण याबाबत विचार  करायला हवा..  #एकतादिवस२०२५ #EktaDiwas2025 #RunForUnity   १९४७ च्या अराजकतेपासून ते एकतेपर्यंत – सरदार वल्लभभाई पटेलांच्या इच्छाशक्ती आणि वाटाघाटींनी भारताला आकार दिला. या एकतेला दृढ करण्यासाठी एकता दिवस साजरा करा.  #एकतादिवस२०२५ #EktaDiwas2025 #RunForUnity   एकतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांनी १९४९ पर्यंत राज्ये भारतीय प्रजासत्ताकात विलीन केली. सर्वसमावेशक भविष्यासाठी भारतीय म्हणून त्यावर भर द्या.  #एकतादिवस२०२५ #EktaDiwas2025 #RunForUnity   ३१ ऑक्टोबर रोजी भारत सरदार वल्लभभाई पटेलांचे स्मरण करतो. लोहपुरुष ज्याने ५६२ संस्थानांना एका राष्ट्रात परिवर्तित केले. त्याची दृढता, दूरदृष्टी आणि एकतेची श्रद्धा यामुळे भारताला आधुनिक नकाशा मिळाला. त्यांचे जीवन आपल्याला स्मरण करून देते की एकीकरण विभाजन नव्हे तर ताकद निर्माण करते.  #एकतादिवस२०२५ #EktaDiwas2025 #RunFo...

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त लेख

Image
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि ‘भारत पर्व २०२५’ राष्ट्रीय एकात्मता वाढवून विविधतेत एकतेचे दर्शन घडविणारा सोहळा                        लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून या दिवसाकडे पाहिले जाते. यानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे ३० ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले असून ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि ‘भारत पर्व २०२५’ हे या कार्यक्रमाचा भाग आहे.                    भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर संस्थानांचे विलिनीकरण करून देशाची भौगोलिक आणि राजकीय एकता साध्य केली. कणखर निर्णयक्षमता, मुत्सद्देगिरी, नैतिक धैर्य आणि देशप्रेम, राष्ट्रीय एक्य ही त्यांची गुणात्मक वैशिष्ट्ये होती. त्यांच्या धैर्यवान नेतृत्वाने आणि ...

फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन

Image
फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा · १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन · तीसहून अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ, आणि धोरणकर्त्यांचा समावेश   मुंबई दि. २८ : वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधोरेखित करणारी मुंबई वातावरण सप्ताह - ‘मुंबई क्लायमेट वीक’ ही जागतिक स्तरावरील परिषद पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हा महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेच्या संकल्पनेतून साकारला जात असून महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. मंत्रालयातील समिती कक्षात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाची घोषणा केली. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, विभागाच्या सचिव जयश्री भोज, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श...

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी – राज्य सेवा हक्क आयुक्त रामबाबू नरुकुल्ला

Image
लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी – राज्य सेवा हक्क आयुक्त रामबाबू नरुकुल्ला उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या होणार गौरव  लोकसेवा हक्क आयोगाची आढावा बैठक  वाशिम, दि. १६ ऑक्टोबर (जिमाका) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ हा नागरिकांना सेवेचा हक्क देणारा कायदा आहे. वाशिम जिल्ह्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व यंत्रणांनी विहित वेळेत कार्यवाही करावी, असे निर्देश अमरावती विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त रामबाबू नरूकुल्ला यांनी दिले.   वाशिम जिल्ह्यातील कामकाज समाधानकारक असून इथुन पुढेही असेच कार्य करावे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गौरविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.     महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ संबंधी श्री.नरूकुल्ला यांच्या अध्यक्षतेत बैठक नियोजन भवनात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.      यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे ,मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, उपव...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी ‘मिशन मोड’वर काम करावे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर नोडल अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय आढावा बैठक

Image
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी ‘मिशन मोड’वर काम करावे          जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर नोडल अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय आढावा बैठक  वाशिम, दि. १४ ऑक्टोबर (जिमाका) जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत आणि वेळेवर पार पडावी, यासाठी सर्व विभागांनी ‘मिशन मोड’वर काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.     जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षणाचा प्रारूप प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक तयारीच्या अनुषंगाने नोडल अधिकाऱ्यांची  आज दि.१४ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी श्री . कुंभेजकर दूरदृष्यप्रणालीव्दारे बोलत होते.      या बैठकीस अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव, उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव,मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ . योगेश क्षीरसागर, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी जयेश खंडारे, ...