जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोग बैठक सूचक निर्देशांकांच्या (इंडिकेटर) प्रगतीचा आढावा

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोग बैठक 

सूचक निर्देशांकांच्या (इंडिकेटर) प्रगतीचा आढावा

वाशिम, दि. ३० सप्टेंबर (जिमाका) जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निती आयोगाने निश्चित केलेल्या इंडिकेटरनुसार सातत्याने प्रगती साधणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. 
      निती आयोगाच्या निर्देशांकांच्या आधारे जिल्ह्याची प्रगती मोजली जाते. आरोग्य, शिक्षण, कृषी, ग्रामीण विकास, कौशल्य विकास, महिला व बालकल्याण आदी महत्त्वाच्या क्षेत्रातील प्रगती व सुधारणा तपासण्यासाठी आज जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली  निती आयोगाची जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली.
  यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, महिला व बालकल्याण संजय गणवीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस ठोंबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संजय राठोड, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त प्रविण खंडारे आदी उपस्थित होते.
    बैठकीत विविध शासकीय विभागांच्या योजनांची अंमलबजावणी, विकास आराखडा तसेच निती आयोगाने ठरवून दिलेल्या इंडिकेटरनुसार जिल्ह्याची स्थिती याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास, कृषी, स्वच्छता, पोषण, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रातील इंडिकेटर मोजले गेले. गेल्या तिमाहीत अनेक निर्देशांकांत सुधारणा झाल्याचे नोंदविण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी  निती आयोगाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टांनुसार जिल्ह्याची प्रगती आणखी गतीमान करण्यासाठी सर्व विभागांनी इंडिकेटरवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले. सर्व विभागांना उद्दिष्टपूर्तीसाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिले तसेच इंडिकेटर सुधारणा हेच आगामी काळात प्राथमिक ध्येय असावे, असे सांगितले.

Comments

Popular posts from this blog

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित

विद्युत सुरक्षा सप्ताहाचा समारोप