२३ जून रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिंक दिनाचे आयोजन


२३ जून रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिंक दिनाचे आयोजन

         वाशिम,दि.१९ जून (जिमाका) : जिल्हा क्रीडा कार्यालय येथे २३ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिंक दिवस म्हणून विविध माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. २३ जून १८९४ रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिंक समितीची स्थापना ग्रीस येथे पीयरे डी कोबर्टीन यांच्याहस्ते करण्यात आली. या दिवसाचे स्मरण म्हणून हा दिवस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिंक दिवस म्हणून साजरा केला जातो.जगभरातील खेळाडूंना सर्वोत्कृष्ठ बनविण्यासाठी प्रोत्साहन देण्यास प्रवृत्त करण्यासाठी ऑलिम्पिंक दिवस साजरा करण्यात येतो. या दिवसाचे महत्व जागविण्यासाठी व खेळाडूंना आकर्षित करण्यासाठी क्रीडाविषयक वातावरण निर्मित्ती करणे व क्रीडाविषयक संवर्धन करण्यासाठी २३ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिंक दिवस म्हणून जिल्हयात साजरा करण्यात येणार आहे. ऑलिम्पिंक दिवसाचे महत्व ओळखून कबड्डी , खोखो, फुटबॉल इत्यादी उपक्रमाचे आयोजन २३ जून रोजी जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे सकाळी १० वाजता करण्यात आले आहे.असे जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी कळविले आहे

***

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश