शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणिकरण करून घ्यावे तहसीलदार शितल बंडगर

शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणिकरण करून घ्यावे

    तहसीलदार शितल बंडगर

वाशिम,दि.५ जून (जिमाका) मंगरुळपीर तालुक्यामध्ये माहे ऑक्टोबर २०२१,सप्टेंबर २०२२ व जुलै २०२३ रोजी अतिवृष्टी होऊन शेतीपिकाचे नुकसान झाले होते.शासन निर्णयानुसार अनुदान वाटपाच्या यादया प्राप्त झाल्या आहेत .या पात्र यादया पोर्टलवर
अपलोड करण्यात आलेल्या आहेत.यादया अपलोड केल्यानंतर प्राप्त झालेल्या विशिष्ट क्रमांकानुसार ज्या शेतकऱ्यांनी सेतु केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण केले आहे. अशा शेतकऱ्यांना देय असणारी अनुदानाची रक्कम मिळालेली आहे. काही शेतकऱ्यांचे अनुदान वितरण कार्यवाहीत आहे. बरेच शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण न केल्याने संबंधित शेतकरी अनुदान मिळण्यापासुन वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. संगणकीय प्रणालीवर बरेच शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण प्रलंबित आहे.

मंगरुळपीर तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की, शेतकरी यांनी माहे ऑक्टोबर 2021,सप्टेंबर 2022 व जुलै 2023 मधील नुकसान भरपाई मिळणेकरीता आपले गावाचे तलाठी / कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधुन त्यांच्याकडुन विशिष्ट क्रमांक (VK नंबर) प्राप्त करुन घ्यावा व आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे.तसेच शासनाने अनुदानाबाबत माहिती स्वतः पाहण्याकरीता पर्याय उपलब्ध करून दिला असुन, आधार प्रमाणिकरण केलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचे अनुदान कोणत्या खात्यात जमा झाले आहे हे तपासण्यासाठी https://mh.
disastermanagement.mahit.org/PaymentStatus या लिंकचा वापर करावा. असे तहसीलदार शितल बंडगर यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश