युवकांना संधी : विवेकशील समाज घडविण्यासाठी उचलले पाऊल
शासनाचा ‘ सोशल मीडिया महामित्र ’ उपक्रम · मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने डिजिटल प्रशस्तीपत्र , सोशल मिडिया महामित्र पुरस्कार · समाज माध्यमांच्या सदुपयोगाबाबत ५ ते १७ मार्च दरम्यान गटचर्चा · सहभागी होण्यासाठी १ ते १८ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी वाशिम, दि. २९ : राज्य शासनाने आधुनिक युगातील वेगवान संपर्क साधनांचा विधायक कार्यासाठी उपयोग करुन घेण्यासाठी आणि तरुणांना जास्तीत जास्त संधी देवून विवेकशील समाज घडविण्यासाठी ‘ सोशल मीडिया महामित्र’ राबविण्याचा निर्धार केला आहे . आधुनिक काळात सोशल मीडिया अत्यंत प्रभावी झाला आहे . बहुतांश युवक मीडियावर सक्रिय असतात . सोशल मीडिया आता मनोरंजनाचे साधन न राहता ज्ञान उपलब्ध करुन घेण्याचे प्रभावी साधन ठरले आहे . लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे अनेकदा सिध्द झाले आहे . देशातील बहुतांश युवक...