‘रन फॉर युनिटी’ दौडला वाशिमकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
· विद्यार्थी, नागरिकांचा सहभाग · जिल्हाधिकाऱ्यांनी दिली राष्ट्रीय एकतेची शपथ वाशिम , दि . ३१ : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिवस हा ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आज वाशिम जिल्हा प्रशासन व विविध सामाजिक संघटनांच्यावतीने ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थी, नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. सर्वप्रथम जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रियांका मीना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चंदनशिव, पोलीस उपाधीक्षक श्री. धात्रक, मारवाडी युवा मंचचे मनीष मंत्री, क्रीडा संघटनेचे धनंजय वानखेडे आदी उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर सकाळी ८ वाजता दौड सुरु झाली. याव...