वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवावे - उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील कोरडे
· ३ ऑक्टोंबर पासून मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम · ८ व २२ ऑक्टोंबर रोजी राबविली जाणार विशेष मोहीम वाशिम , दि. २८ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दि. ३ ऑक्टोबर २०१७ ते दि. ५ जानेवारी २०१८ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या दरम्यान दि. ३ ऑक्टोंबर ते ३ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहे. याच कालावधीत नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज स्वीकारले जाणार असून वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीने मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील कोरडे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले. मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमानुसार प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी मंगळवार दि. ३ ऑक्टोबर २०१७ रोजी केली जाणार आहे. दावे व हरकती दि. ३ ऑक्टोबर ते दि. ३ नोव्हेंबर २०१७ या काला...