वाशिम येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन


वाशिम येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन

वाशिम,दि.११ ऑगस्ट (जिमाका) कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व तालुका कृषी अधिकारी वाशिम कार्यालयाच्या वतीने तहसील कार्यालय वाशिम सभागृहात रानभाजी महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणात येणाऱ्या विषमुक्त पौष्टिक रानभाज्याचा आपल्या आहारात समावेश होऊन आरोग्य निरोगी राहावे याकरिता तसेच रानभाज्या उत्पादकांना व विक्रेत्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच रानभाज्याच्या पौष्टिक व आरोग्यदायी गुणधर्मांचा परिचय व्हावा याकरिता सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय नवीन सभागृह वाशिम येथे आयोजित केला आहे तरी वाशिम शहर परिसरातील नागरिकांनी तसेच ग्रामीण भागातील रानभाज्या उत्पादकांनी सदर कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश