यशने गाठले किलीमांजारो शिखर आता स्वप्न एव्हरेस्ट गाठण्याचे 15 ऑगस्टला किलीमांजारोवर फडकविला राष्ट्रध्वज
यशने गाठले किलीमांजारो शिखर आता स्वप्न एव्हरेस्ट गाठण्याचे 15 ऑगस्टला किलीमांजारोवर फडकविला राष्ट्रध्वज वाशिम , दि. 24 (जिमाका) : दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाच्या बळावर निश्चित केलेले ध्येय सहज पुर्ण करता येते, अशाच एका ध्येयाची पुर्तता वाशिम येथील 19 वर्षीय तरुण यश मारोती इंगोले याने आफ्रीका खंडातील सर्वोच्च शिखर किलीमांजारोची 19 हजार 341 फुटाची चढाई करुन केली. विशेष म्हणजे ही कामगिरी यशने 15 ऑगस्ट 2021 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनी किलीमांजारोवर राष्ट्रध्वज फडकवून केली. किलीमांजारो चढण्याचे ध्येय गाठल्यानंतर आता त्याचे स्वप्न जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट गाठण्याचे आहे. वाशिम तसा मागास जिल्हा. मोठया प्रमाणात क्रीडा सुविधा उपलब्ध नसतांना तसेच जिल्हयाच्या भौगोलीक क्षेत्रात दऱ्याखोऱ्या, पर्वतरांगा नसतांना देखील यश गिर्यारोहणाची आवड आपल्या वडिलांकडून जोपासत दररोज 10 कि.मी. धावणे आणि 20 कि.मी. सायकलींग करणे असा यशचा नित्यक्रम झाला आहे. रविवारी तर यश 30 ते 35 किलोमीटर सायकलींग करतो. वडिलांकडून त्याने गिर्यारोहणाचा छंद जोपासला आहे. आपल्या मुलाने या क्षेत...