वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन करा - विभागीय आयुक्त पीयूष सिंह
· ३३ कोटी वृक्ष लागवड मोहीम पूर्वतयारीचा आढावा वाशिम , दि. २४ : राज्य शासनामार्फत यावर्षी राबविण्यात येत असलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत वाशिम जिल्ह्यात सुमारे ४३ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वृक्ष लागवडीचे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय विभागांनी योग्य व परिपूर्ण नियोजन करून त्यानुसार अंमलबजावणी करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या वृक्ष लागवड मोहिमेबाबतच्या आढावा बैठकीत दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, उपवनसंरक्षक सुमंत सोळंकी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी महसूल रमेश काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधीक्षक अतुल कानडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक उत्तम फड यांची प्रमुख उपस्थिती होती. विभागीय आयुक्त श्री. सिंह म्हण...