Posts
Showing posts from May, 2017
Mee Mukhyamantri Boltoy-CM Devendra Fadnavis interacting with students o...
- Get link
- X
- Other Apps
वीज ग्राहकांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करा - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
- Get link
- X
- Other Apps
· ऊर्जामंत्र्यांचा वाशिम जिल्ह्यातील वीज ग्राहकांशी थेट संवाद · वीज जोडणीसाठी पैसे मागणाऱ्यांविरोधात पोलीस तक्रार करण्याचे आवाहन · मानवी अपघाताची प्रलंबित प्रकरणे सात दिवसांत निकाली काढण्याचे आदेश · मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी, अभियंते, कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्ते बंद करणार वाशिम, दि. १८ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व वीज ग्राहकांनी जनतेशी थेट संवाद कार्यक्रमात मांडलेल्या तक्रारी सोडविण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी, अभियंते यांनी तात्काळ कार्यवाही करून याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात जनतेशी थेट संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक...
ग्राम विद्युत व्यवस्थापक नेमणुकीची कार्यवाही गतिमान करा - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
- Get link
- X
- Other Apps
· जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतींमध्ये होणार नेमणुका · ग्रामीण भागातील विद्युत जोडणी देखभालीची जबाबदारी · प्रत्येक महिन्याला जिल्हाधिकारी घेणार कृषीपंप जोडणीचा आढावा वाशिम, दि. १८ : जिल्ह्यातील ३ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ६० ग्रामपंचायतींमध्ये ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नेमणूक करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीमार्फत स्थानिक आयटीआय वीजतंत्री पात्रताधारक उमेदवाराचे नावाची शिफारस घेऊन ही नेमणूक करावी. याबाबत जिल्हा प्रशासन व महावितरणने विशेष प्रयत्न करून नेमणुकांच्या कार्यवाहीला गती देण्याच्या सूचना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे...
वाशिम जिल्ह्यातील सर्व विद्युत उपकेंद्रांची क्षमता वाढविणार - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
- Get link
- X
- Other Apps
· जिल्ह्यातील तीन विद्युत उपकेंद्रांच्या कामांचे भूमिपूजन · डोंगरकिन्ही, कुऱ्हा उपकेंद्राचे कामही लवकरच सुरु होणार · ग्रामपंचायत, नगरपरिषदमध्ये विद्युत व्यवस्थापक नेमणार · बेरोजगार अभियंत्यांना ७५ लाखांपर्यंतची कामे देण्याच्या सूचना वाशिम, दि. १८ : जिल्ह्यातील अनेक ३३/११ के.व्ही.ची उपकेंद्रे अतिभारीत झाल्यामुळे वीज जोडण्या प्रलंबित आहेत. तसेच पुरेसा दाबाने वीज पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या सर्व उपकेंद्राची क्षमता ५ एम.व्ही.ए. वरून १० एम.व्ही.ए. करण्यात येणार आहे. याकरिता प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात बेलमंडल (ता. कारंजा), आसेगाव पेन (ता. रिसोड) व कुपटा (ता. मानोरा) येथील ३३/११ के.व्ही. विद्युत उपकेंद्रांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते....
वाशिम जिल्ह्यातील विद्युत यंत्रणा सक्षमीकरणासाठी १५० कोटी रुपयांचा निधी - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
- Get link
- X
- Other Apps
· शिरपूर-खंडाळा विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण · राज्यात मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना राबविणार · शेतकऱ्यांना ऊर्जा बचत करणारे कृषीपंप देणार · राज्यातील शेतकऱ्यांना आणखी १० हजार सौर कृषीपंप मिळणार वाशिम, दि. १७ : विद्युत सक्षमीकरणासाठी वाशिम जिल्ह्याकरिता १५० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याने जिल्ह्यातील वीज विषयक बहुतांशी प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मालेगाव तालुक्यातील शिरपूर-खंडाळा येथील ३३/११ के.व्ही. विद्युत उपकेंद्राच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हा परिषद सदस्य शबानाबी मोहम्मद इमदाद, मालेगाव पंचायत समितीच्या सभापती मंगला गव...
वृक्ष लागवड मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा होणार सन्मान - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी
- Get link
- X
- Other Apps
· लोकसहभागातून वृक्ष लागवड, संवर्धन होणे आवश्यक · स्वयंसेवी संस्थानीही पुढाकार घेण्याचे आवाहन वाशिम , दि . १६ : पन्नास कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत दि. १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभाग नोंदवून आपल्या आपल्या लोकसंख्ये इतकी वृक्ष लागवड करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा स्वातंत्र्य दिनादिवशी सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक आर. बी. गवई, कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, वाशिमच्या उपविभागीय अधिकारी कु. क्रांती डोंबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावासाने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्यासह सर्व तहसीलदार व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वाशिम जिल्ह्याला ५ लक्ष ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या अनुष...
पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण
- Get link
- X
- Other Apps
वाशिम , दि . ०१ : महाराष्ट्र दिनानिनिमित्त आयोजित मुख्य प्रशासकीय कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘शांतीदूत’ या माहितीपुस्तिकेचे विमोचनही यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील, वाशिमच्या उपविभागीय अधिकारी कु. क्रांती डोंबे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. बी. पटेल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, तहसीलदार बळवंत अरखराव आदी उपस्थित होते. धानोरा येथील धानोरकर आदर...
कृषी विकासाच्या योजना राबविण्यास प्राधान्य - पालकमंत्री संजय राठोड
- Get link
- X
- Other Apps
· वाशिम येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण · पाणी टंचाई निवारणार्थ २ कोटी १७ लक्ष रुपयांचा आराखडा · खरीप हंगामात ११५० कोटी पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट्य वाशिम , दि . ०१ : राज्यात शेती व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. याकरिता कृषी विकासासाठी योजना राबविण्यास प्राधान्य देण्यात येत असून जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हि...