Posts

Showing posts from October, 2025

#एकतादिवस२०२५#EktaDiwas2025#RunForUnity

Image
सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात, "प्रत्येक भारतीयाने तो राजपूत, शीख किंवा जाट आहे हे विसरून जावे - तो भारतीय आहे." एकता दिवस दरम्यान एक भारतीय म्हणून आपण याबाबत विचार  करायला हवा..  #एकतादिवस२०२५ #EktaDiwas2025 #RunForUnity   १९४७ च्या अराजकतेपासून ते एकतेपर्यंत – सरदार वल्लभभाई पटेलांच्या इच्छाशक्ती आणि वाटाघाटींनी भारताला आकार दिला. या एकतेला दृढ करण्यासाठी एकता दिवस साजरा करा.  #एकतादिवस२०२५ #EktaDiwas2025 #RunForUnity   एकतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांनी १९४९ पर्यंत राज्ये भारतीय प्रजासत्ताकात विलीन केली. सर्वसमावेशक भविष्यासाठी भारतीय म्हणून त्यावर भर द्या.  #एकतादिवस२०२५ #EktaDiwas2025 #RunForUnity   ३१ ऑक्टोबर रोजी भारत सरदार वल्लभभाई पटेलांचे स्मरण करतो. लोहपुरुष ज्याने ५६२ संस्थानांना एका राष्ट्रात परिवर्तित केले. त्याची दृढता, दूरदृष्टी आणि एकतेची श्रद्धा यामुळे भारताला आधुनिक नकाशा मिळाला. त्यांचे जीवन आपल्याला स्मरण करून देते की एकीकरण विभाजन नव्हे तर ताकद निर्माण करते.  #एकतादिवस२०२५ #EktaDiwas2025 #RunFo...

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त लेख

Image
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि ‘भारत पर्व २०२५’ राष्ट्रीय एकात्मता वाढवून विविधतेत एकतेचे दर्शन घडविणारा सोहळा                        लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून या दिवसाकडे पाहिले जाते. यानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे ३० ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले असून ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि ‘भारत पर्व २०२५’ हे या कार्यक्रमाचा भाग आहे.                    भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर संस्थानांचे विलिनीकरण करून देशाची भौगोलिक आणि राजकीय एकता साध्य केली. कणखर निर्णयक्षमता, मुत्सद्देगिरी, नैतिक धैर्य आणि देशप्रेम, राष्ट्रीय एक्य ही त्यांची गुणात्मक वैशिष्ट्ये होती. त्यांच्या धैर्यवान नेतृत्वाने आणि ...

फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन

Image
फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा · १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन · तीसहून अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ, आणि धोरणकर्त्यांचा समावेश   मुंबई दि. २८ : वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधोरेखित करणारी मुंबई वातावरण सप्ताह - ‘मुंबई क्लायमेट वीक’ ही जागतिक स्तरावरील परिषद पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हा महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेच्या संकल्पनेतून साकारला जात असून महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. मंत्रालयातील समिती कक्षात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाची घोषणा केली. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, विभागाच्या सचिव जयश्री भोज, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श...

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी – राज्य सेवा हक्क आयुक्त रामबाबू नरुकुल्ला

Image
लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी – राज्य सेवा हक्क आयुक्त रामबाबू नरुकुल्ला उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या होणार गौरव  लोकसेवा हक्क आयोगाची आढावा बैठक  वाशिम, दि. १६ ऑक्टोबर (जिमाका) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ हा नागरिकांना सेवेचा हक्क देणारा कायदा आहे. वाशिम जिल्ह्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व यंत्रणांनी विहित वेळेत कार्यवाही करावी, असे निर्देश अमरावती विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त रामबाबू नरूकुल्ला यांनी दिले.   वाशिम जिल्ह्यातील कामकाज समाधानकारक असून इथुन पुढेही असेच कार्य करावे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गौरविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.     महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ संबंधी श्री.नरूकुल्ला यांच्या अध्यक्षतेत बैठक नियोजन भवनात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.      यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे ,मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, उपव...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी ‘मिशन मोड’वर काम करावे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर नोडल अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय आढावा बैठक

Image
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी ‘मिशन मोड’वर काम करावे          जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर नोडल अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय आढावा बैठक  वाशिम, दि. १४ ऑक्टोबर (जिमाका) जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत आणि वेळेवर पार पडावी, यासाठी सर्व विभागांनी ‘मिशन मोड’वर काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.     जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षणाचा प्रारूप प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक तयारीच्या अनुषंगाने नोडल अधिकाऱ्यांची  आज दि.१४ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी श्री . कुंभेजकर दूरदृष्यप्रणालीव्दारे बोलत होते.      या बैठकीस अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव, उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव,मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ . योगेश क्षीरसागर, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी जयेश खंडारे, ...

ई ऑफीस' डिजिटल प्रशासनाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर 'ई ऑफीस' प्रणालीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण संपन्न

Image
'ई ऑफीस' डिजिटल प्रशासनाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल          जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर 'ई ऑफीस' प्रणालीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण संपन्न वाशिम, दि. १४ ऑक्टोबर (जिमाका) शासकीय कामकाजात पारदर्शकता, वेग आणि कार्यक्षमता आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे आज दि.१४ ऑक्टोबर रोजी ई-ऑफिस प्रणालीबाबतचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या प्रशिक्षणामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रशिक्षणात ई-ऑफिस प्रणालीचा उद्देश, फायदे, वापरण्याची पद्धत, फायलींचे डिजिटायझेशन, मंजुरी प्रक्रिया, दस्तऐवजांची नोंदणी आणि ट्रॅकिंग प्रणाली याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव, उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, वाशिम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर तसेच सर्व तहसीलदार आणि सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान जिल्हाधिकारी कुंभेजकर ...

आपत्ती धोके निवारण दिना’निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिज्ञा संपन्न

Image
'आपत्ती धोके निवारण दिना’निमित्त  जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिज्ञा संपन्न वाशिम, दि. १३ ऑक्टोबर (जिमाका): संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्यानुसार दरवर्षी १३ ऑक्टोबर हा दिवस ‘आपत्ती धोके निवारण दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त आज दि.१३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न झाला.        या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी खालीलप्रमाणे प्रतिज्ञा केली. > “मी प्रतिज्ञा करतो/करते की शासनाच्या आपत्ती सौम्यीकरणाच्या विविध उपक्रमात मी सक्रिय सहभाग नोंदवून,आपत्तीपासून माझी, माझ्या परिवाराची, माझ्या समाजाची व सार्वजनिक मालमत्तेची सुरक्षा करण्याविषयी ज्ञान प्राप्त करीन.आपत्ती धोके कमी करणाऱ्या समुदाय-आधारित उपक्रमांमध्ये मी सक्रिय सहभाग घेईन.माझ्या परिवारात व समाजात आपत्तीबद्दल जनजागृती करून, त...

महाराष्ट्रात अमृततर्फे दीपावलीमध्ये होणार विश्वविक्रमी दुर्गोत्सवछत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना

Image
महाराष्ट्रात अमृततर्फे दीपावलीमध्ये होणार विश्वविक्रमी दुर्गोत्सव छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना               विजय जोशी  वाशिम,दि. १३ ऑक्टोबर (जिमाका) महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्ग, गड यांचा सार्थ अभिमान अवघ्या भारतदेशाला आहे. दर दिवाळी सणामध्ये बच्चेकंपनी मातीचे किल्ले बनवून छत्रपतींच्या कार्याचे स्मरण आणि अभिवादन करत असते. याच दुर्गांच्या प्रतिकृती साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र संसोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात 'अमृत'ने दुर्गोत्सवाचे आयोजन या दीपावलीमध्ये केले आहे. हा एक विश्वविक्रम करण्याचा संकल्प अमृतने केला आहे. शिवछत्रपतींच्या पराक्रमांचे साक्षीदार असलेल्या १२ दुर्गांना युनेस्कोच्या जागतिक वारसाच्या वास्तूंमध्ये समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि साऱ्या महाराष्ट्राचा ऊर अभिमानाने भरून आला. दर वर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये घरोघरी बालदोस्त आणि तरुण, ज्येष्ठ मंडळीसुद्धा दुर्गांच्या प्रतिकृती साकारतात. नागरिकांनी आपल्...

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

Image
*विशेष वृत्त*:  भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा        जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर   वाशिम, (जिमाका) शासनाने भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ मध्ये रूपांतरणासाठी महसूल व वनविभागाच्या अधिसुचनेनुसार दि.४ मार्च २०२५ नुसार महाराष्ट्र शासन राजपत्रात सुचना जारी करण्यात आली आहे.त्यानुसार ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज करणाऱ्यांना विशेष सवलत मिळणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे. *सवलतीचे मुख्य मुद्दे*:   कृषिक प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग २ धारणाधिकार किंवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनीचे भोगवटादार वर्ग १ मध्ये रूपांतरणासाठी अधिमूल्य रक्कमेत ३१ डिसेंबर पर्यंत सवलत मिळणार आहे. नगरपंचायत/नगरपरिषद/ विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीबाहेरील कृषी प्रयोजनासाठी ज्या जमिनी शेती / ना विकास वापर विभागात स्थित आहेत.अश्या जमिनी रुपांतरणासाठी शेतीच्या दराप्रमाणे येणाऱ्या क...

जि.प. सार्वत्रिक निवडणूक २०२५५२ पदांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत जाहीर

Image
जि.प. सार्वत्रिक निवडणूक २०२५ ५२ पदांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत जाहीर वाशिम,दि.१३ ऑक्टोबर (जिमाका) जि.प. सार्वत्रिक निवडणूक २०२५  एकुण 52 जि.प. गटासाठी आरक्षण सोडत आज दि.१३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी तथा पिठासिन अधिकारी जि.प.निवडणूक योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी जि.प.निवडणूक राजेंद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.        वाशिम जि.प.गटासाठी विभागीय आयुक्त अमरावती यांनी मान्यता दिलेले आरक्षण पुढीलप्रमाणे आहे. अनुसूचित जाती एकूण 11 जागा सर्वसाधारण 5, महिला 6, अनुसूचित जमाती एकूण 4 जागा सर्वसाधारण 2, महिला 2, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण 14 जागा सर्वसाधारण 7 महिला 7, सर्वसाधारण एकूण 23 जागा सर्वसाधारण 12, महिला 11 अश्या एकूण 52 जागांसाठी आरक्षण सोडत उत्साहात पार पडली.       लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार अनुसूचित जातीसाठी 17 पारवा, 35 गोवर्धन, 29 ब्राम्हणवाडा , 48 आडोळी, 49 तोंडगाव, 50 उकळीपेन,36 र...

शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता राखून योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय सभा संपन्न

Image
शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता राखून योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी     जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर  कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय सभा संपन्न  वाशिम, (जिमाका) कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढ, आर्थिक सुरक्षितता आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान प्रसारासाठी कार्यरत आहेत. या योजनेत पीक विमा, सेंद्रिय शेती, मृदा चाचणी, प्रशिक्षण आणि सामाजिक सुरक्षा यांचा समावेश असून शेतकऱ्यांपर्यंत यांचा प्रत्यक्ष फायदा पोहोचवण्यासाठी जिल्हास्तरीय समित्या सक्रिय आहेत. शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता राखून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.     दि.१० ऑक्टोबर रोजी विविध कृषीविषयक योजनांच्या जिल्हास्तरीय समित्यांच्या महत्त्वपूर्ण बैठका जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात संपन्न झाल्या. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते .       बैठकीत कृषी समृद्धी योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन आणि आत्मा नियामक मंडळ यांचा...

आरटीएस (महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम) अंतर्गत सर्वत्र अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा लोकसेवा ऑनलाईन प्राप्त करण्यासाठी ‘आपले सरकार पोर्टल’चा वापर करा

Image
आरटीएस (महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम) अंतर्गत      सर्वत्र अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा  जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा लोकसेवा ऑनलाईन प्राप्त करण्यासाठी ‘आपले सरकार पोर्टल’चा वापर करा वाशिम, दि. ९ ऑक्टोबर (जिमाका)  पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंमंलात आणला आहे. या अधिनियमान्वये प्रत्येक शासकीय विभागाने पात्र व्यक्तींना लोकसेवा विहित कालमर्यादेत प्रदान करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार नागरिकांना शासकीय विभागाच्या अधिसूचित सेवा विहित वेळेत मिळण्यासाठी या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी  जिल्हा प्रशासनाला केल्या. तसेच नागरिकांच्या माहितीसाठी प्रत्येक शासकीय विभागाने त्यांच्या कार्यालयाव्दारे प्रदान करण्यात येणाऱ्या अधिसूचित सेवांचे फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक असल्याने त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देशही श्री .कुंभेजकर यांनी दिले.         महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ ...

विशेष वृत्त: पायाभूत प्रकल्पांसाठी युनिक आयडी अनिवार्य – शासनाचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण संपन्न – यंत्रणा प्रमुखांची उपस्थिती

Image
विशेष वृत्त:  पायाभूत प्रकल्पांसाठी युनिक आयडी अनिवार्य – शासनाचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण संपन्न – यंत्रणा प्रमुखांची उपस्थिती वाशिम,  (जिमाका) राज्यातील सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे सुयोग्य नियोजन, कार्यान्वयनात सुसूत्रता, सर्व भागांचा समतोल विकास तसेच अनावश्यक खर्च टाळण्यासाठी प्रत्येक पायाभूत प्रकल्पास युनिक पायाभूत सुविधा आयडी (UID for MH) प्रदान करण्यासाठी युनिक पायाभूत सुविधा पोर्टल विकसित करण्यात आले आहे. हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर वर्धा जिल्ह्यात राबविण्यात आला असून, दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषद तसेच इतर संबंधित यंत्रणांचा यात समावेश करण्यात आलेला आहे. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दि. ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडलेल्या व्ही.सी. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, राज्यातील सर्व जिल्ह्यांतील संबंधित अधिकाऱ्यांना युनिक पायाभूत सुविधा आयडी पोर्टल (UID for MH) बाबत सविस्तर माहिती होणे आवश्यक आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र (महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लि...

वार्षिक कृती आराखडा २०२५-२६ सादरीकरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर आढावा बैठक संपन्न

Image
वार्षिक कृती आराखडा २०२५-२६ सादरीकरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर आढावा बैठक संपन्न  वाशिम,  (जिमाका) जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली आज वार्षिक कृती आराखडा  २०२५-२६ सादरीकरणासंदर्भात सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील,सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संजय राठोड, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक पुनम घूले,  ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे आदी विभागप्रमुख उपस्थित होते. बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी वार्षिक कृती आराखड्याचा तपशीलवार मसुदा  पाहिला. महास्ट्राईडचे मोहम्मद आमीन यांनी अधोरेखित केलेल्या मसुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील २ ते ३ दिवसांत संबंधित यंत्रणांनी समन्वय ठेवून विसंगती असल्यास दूर करण्याचे निर्देश दिले. वार्षिक कृती आराखड्याबरोबरच बैठकीत “MITRA आणि MAITRI च्या माध्यमातून जिल्हास्तरीय समन्वय” या विषयावरही चर्चा झाली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी    जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांन...

रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठीआवश्यक उपाययोजना करा योगेश कुंभेजकर जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समिती सभा संपन्न

Image
रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा                                   योगेश कुंभेजकर जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समिती सभा संपन्न         वाशिम, दि. ९ ऑक्टोबर (जिमाका) : जिल्हयातून राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्हा मार्ग जातात. या मार्गावरुन जाणारी वाहने भरधाव वेगाने मार्गक्रमण करतात. संबंधित विभागाने आवश्यक त्या ठिकाणी गतीरोधक बसविण्याची कार्यवाही करण्यासाठी घटनास्थळी भेट दयावी. गतीरोधक दर्शविणारे फलक लावून रस्त्यांवरील असलेले खड्डे बुजविण्याचे काम प्राधान्याने करावे. संबंधित यंत्रणांनी रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष योगेश कुंभेजकर यांनी दिले.           जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची जिल्हास्तरीय समिती सभा दि.८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत हो...

वाशिममध्ये ९५ उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरण सोहळा ४ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री ना .दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते; मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत उपक्रम

Image
वाशिममध्ये ९५ उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरण सोहळा ४ ऑक्टोबर रोजी  पालकमंत्री ना .दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते; मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत उपक्रम वाशिम, दि. २ ऑक्टोबर (जिमाका) मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सर्वसमावेशक सुधारित अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार वाशिम जिल्ह्यातील ९५ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत. यामध्ये अनुकंपा धोरणांतर्गत ४९ उमेदवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त ४६ उमेदवार यांचा समावेश असून नियुक्ती आदेश वितरण सोहळा दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम (नियोजन भवन समिती सभागृह) येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राज्याचे कृषीमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते नियुक्ती आदेशांचे वितरण होणार आहे. नियुक्ती आदेश मिळणारे सर्व उमेदवार, संबंधित नियुक्ती प्राधिकारी तसेच जिल्ह्यातील कार्यालय प्रमुखांनी सकाळी १० वाजता नियोजन भवन येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे. या स...

शासकीय सेवेत आपल्या कार्यातून प्रशासनात मौल्यान्वित योगदान द्यावे पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे सेवाभावाने कार्य करून प्रशासनाचा चेहरा उजळवा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

Image
शासकीय सेवेत आपल्या कार्यातून प्रशासनात मौल्यान्वित योगदान द्यावे         पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे  सेवाभावाने कार्य करून प्रशासनाचा चेहरा उजळवा       जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर  अनुकंपा नियुक्ती व लिपीक टंकलेखक भरती जिल्हास्तरीय रोजगार मेळावा उत्साहात संपन्न  वाशिम, दि. ४ ऑक्टोबर (जिमाका)  शासकीय सेवेत रुजू होत असताना नागरिकाभिमुख, जबाबदार आणि कार्यक्षम अशा भावनेने कार्य करा. शासनाने निर्माण केलेल्या संधींचा उपयोग समाजहितासाठी करा आणि आपल्या कार्यातून प्रशासनात मौल्यान्वित योगदान द्यावे. असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांनी केले. त्यांनी पुढे असेही सांगितले की, शासनाची सेवा ही केवळ नोकरी नसून समाजसेवेचे माध्यम आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या कार्यातून जनतेच्या विश्वासाला पात्र ठरावे. पारदर्शकता, तत्परता आणि प्रामाणिकपणा या मूल्यांच्या आधारे काम केल्यास शासनव्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वा...

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोग बैठक सूचक निर्देशांकांच्या (इंडिकेटर) प्रगतीचा आढावा

Image
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोग बैठक  सूचक निर्देशांकांच्या (इंडिकेटर) प्रगतीचा आढावा वाशिम, दि. ३० सप्टेंबर (जिमाका) जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निती आयोगाने निश्चित केलेल्या इंडिकेटरनुसार सातत्याने प्रगती साधणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.        निती आयोगाच्या निर्देशांकांच्या आधारे जिल्ह्याची प्रगती मोजली जाते. आरोग्य, शिक्षण, कृषी, ग्रामीण विकास, कौशल्य विकास, महिला व बालकल्याण आदी महत्त्वाच्या क्षेत्रातील प्रगती व सुधारणा तपासण्यासाठी आज जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली  निती आयोगाची जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली.   यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, महिला व बालकल्याण संजय गणवीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस ठोंबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संजय राठोड, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त प्रविण खंडारे आदी उपस्थित होते.     बैठकीत विविध शासकीय व...

शासकीय योजनांचा लाभ घ्या” जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर मुसळवाडी येथे आदी सेतू शिबीर उत्साहात संपन्न

Image
“शासकीय योजनांचा लाभ घ्या”      जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर मुसळवाडी येथे आदी सेतू शिबीर उत्साहात संपन्न वाशिम,(जिमाका) नागरिकांसाठी  विविध शासकीय योजना राबविण्यात येतात. प्रत्येक विभागामार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचा लाभ देण्यात येतो. नागरिकांनी योजनांची माहिती संग्रही ठेवावी. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. दि.१ ऑक्टोबर रोजी सेवा पंधरवड्याच्या औचित्याने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आदी सेतू शिबीराचे आयोजन मालेगाव तालुक्यातील मुसळवाडी येथे करण्यात आले.याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर बोलत होते.      यावेळी अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार दीपक पुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय गणवीर,तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे, गटविकास अधिकारी रमेश कंकाळ, बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक आदी उपस्थित होते.     जिल्हाधिकारी पु...

विलंबित जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेत काटेकोरपणे विहीत मुदतीत काम करावे ‌‍‌ जिल्हाधिकारी कुंभेजकर

Image
विलंबित जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेत काटेकोरपणे विहीत मुदतीत काम करावे  ‌‍‌     जिल्हाधिकारी कुंभेजकर वाशिम, दि. ३० सप्टेंबर (जिमाका)  १ नोव्हेंबर १९७७ पासून जन्म- मृत्यूच्या नोंदणी करण्यात येतात. या अधिनियमाच्या कलम ३० अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन केंद्र शासनाच्या मान्यतेने  महाराष्ट्र जन्म - मृत्यू नोंदणी नियम अंमलात असून  जन्म-मृत्यूच्या नोंदी  घेण्यात येतात. शासन अधिसूचनेन्वये जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ चे कलम १३ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.        भारत सरकारने जन्म-मृत्यू अधिनियम, १९६९ मध्ये सुधारणा करुन विलंबित जन्म-मृत्यू नोंदीचे आदेश देण्याचे अधिकार तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी यांना प्रदान केले आहेत. जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ व महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम, २००० अन्वये जन्म व मृत्यू नोंदणी करण्याची कार्यपध्दती निश्चित करण्यात आलेली आहे. यासाठी जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्र...