जवाहर नवोदय विद्यालयाचे नेत्रदीपक यश • इयत्ता दहावी व बारावीचा शंभर टक्के निकाल


जवाहर नवोदय विद्यालयाचे नेत्रदीपक यश 
• इयत्ता दहावी व बारावीचा शंभर टक्के निकाल

वाशिम,दि.16 मे (जिमाका) केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी व बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये वाशिम येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. इयत्ता बारावीत कृष्णा गणेश घुगे 94.83% यांनी प्रथम क्रमांक , द्वितीय क्रमांक रवींद्र गोपाल राऊत 94. 67% तृतीय क्रमांक हर्षद रामराव भोयर 94.33% व तनिष्क राजकुमार पडघान यांनी 94.33% गुण मिळविले. दहावी मध्ये प्रथम क्रमांक अनुष्का भास्कर नागरगोजे, अथर्व विजय केकन, भक्ती भारत नरवाडे या तिन विद्यार्थ्यांनी  96. 60% गुण मिळविले. द्वितीय क्रमांक आर्यन मदन खाडे, नयन भारत शिंदे ,सुजल नितेश जाधव 96.20% गुण या तीनही विद्यार्थ्यांनी प्राप्त केले. तृतीय क्रमांक गणेश सागर भेलांडे यांनी 94.60% गुण घेतले. विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशात प्राचार्य सचिन खरात,उपप्राचार्य  सुभाष लष्करी व सर्व शिक्षक, अन्य कर्मचाऱ्यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश