पोलीस कवायत मैदान येथे महाराष्ट्र दिनाचा ६४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्याहस्ते राष्ट्रध्वजारोहण


पोलीस कवायत मैदान येथे

महाराष्ट्र दिनाचा ६४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्याहस्ते राष्ट्रध्वजारोहण

वाशिम दि.०१ मे (जिमाका) महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम वाशिम येथील पोलीस कवायत मैदान येथे उत्साहात संपन्न झाला.जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे,सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती अपूर्वा बासूर, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पुजारी, तहसीलदार निलेश पळसकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
              ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत झाले.श्रीमती बुवनेश्वरी एस यांनी परेडचे निरीक्षण केले. यावेळी  जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांनी  महाराष्ट्र दिनाचा शुभेच्छापर संदेश दिला. वाशिम पोलीस दलाचे पुरुष व महिला पथक,गृहरक्षक दलाचे पुरुष व महिला पथक,पोलीस बँण्ड पथक दल, श्वानपथक , मोबाईल फॉरेन्सिक इन्वेस्टीगेशन व्हॅन, पोलिस बॉम्ब डिस्पोजल व्हॅन, रूग्णवाहीका ,अग्नीशमन दलाचे वाहन परेडमध्ये सहभागी झाले होते. परेडमध्ये सहभागी पथकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.श्रीमती बुवनेश्वरी एस यांनी यावेळी कार्यक्रमाला उपस्थित विविध क्षेत्रातील नागरीकांची सदिच्छा भेट घेतली. वीर पत्नी शांताबाई यशवंत सरकटे, पार्वतीबाई दगडू लहाने,वैशाली अमोल गोरे यांना सन्मानीत करण्यात आले. उपजिल्हाधिकारी मोहन व्यवहारे, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार तसेच विविध कार्यालयाचे कार्यालय प्रमुख व कर्मचारी तसेच नागरिकांची उपस्थिती होती.
         यावेळी पोलिस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह प्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक मोहन शिरसाठ यांनी केले. कार्यक्रमाला विविध मान्यवर,पत्रकार बांधव, कर्मचारी,नागरिक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश