‘कोरोना’ची लस सुरक्षित, कोणताही त्रास जाणवला नाही !
· लस टोचून घेतलेल्या कोरोना योद्ध्यांशी संवाद · विषाणू संसर्ग टाळण्यासाठी सर्वांनी लस घेण्याचे आवाहन वाशिम , दि. १९ : कोरोना विषाणू संसार्गाला रोखण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला शनिवारपासून प्रारंभ झाला आहे. वाशिम जिल्ह्यातही तीन ठिकाणी ही मोहीम सुरु झाली आहे. या मोहिमेंतर्गत वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय येथील लसीकरण केंद्रात आज, लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी ही लस सुरक्षित असल्याचे सांगितले. तसेच लस टोचून घेतल्यानंतर कोणताही त्रास जाणवला नाही, कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी लस घेणे आवश्यक असून सर्वांनी लस घेण्याचे आवाहनही केले. वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील क्ष-किरण तज्ज्ञ डॉ. विश्वनाथ बगाटे यांनीही आज लस घेतली. लस घेतल्यानंतर त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वार्डमध्ये आम्ही काम करीत आहे. कोरोना बाधितांवर उपचार करीत असताना मनोमन वाटत होते की, या आजारावरील लस लवकर या...