१५ जुलैपासून मंगरूळपीर, रिसोडमध्ये संपूर्ण लॉकडाऊन; तर इतर चार शहरांमध्ये ८ ते २ वाजेपर्यंतच दुकाने सुरु राहणार
वाशिम , दि. १३ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी मंगरूळपीर रिसोड या शहरांमध्ये तसेच लगतच्या काही गावांमध्ये १५ जुलैपासून सात दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत सर्व दुकाने , आस्थापना , खासगी कार्यालये , पेट्रोलपंप , बँक बंद राहणार आहेत. सकाळी ७ ते १० वा. पर्यंत केवळ दुध व भाजीपाला विक्री सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. वाशिम , मालेगाव , कारंजा लाड आणि मानोरा या शहरांमध्ये सुद्धा लॉकडाऊनची सुधारित नियमावली लागू येणार आहे. या चारही शहरांमधील यापूर्वी परवानगी दिलेली सर्व दुकाने , आस्थापना सुरु ठेवण्याचा कालावधी १५ जुलैपासून सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर सर्व आस्थापना , दुकाने व सार्वजनिक ठिकाणी लोकांनी सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करणे , मास्क , सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले. मात्र , या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले असून त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मंग...