केंद्रीय पथकाने केली वाशिम जिल्ह्यातील पीक नुकसानीची पाहणी
वाशिम , दि. २४ : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात आलेल्या अवेळी पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. केंद्र सरकारने या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी एक केंद्रीय पथक गठीत केले आहे. या पथकातील केंद्रीय कृषि मंत्रालयांतर्गत येणाऱ्या कापूस विकास संचालनालयाच्या कृषि व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. आर. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जिल्ह्यात नुकसान झालेल्या शेतीची आज, २४ नोव्हेंबर रोजी पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, अमरावती विभागाचे कृषि सहसंचालक सुभाष नागरे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, रिसोडचे तहसीलदार अजित शेलार, वाशिमचे तहसीलदार विजय साळवे, तालुका कृषि अधिकारी अभिजित देवगिरीकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. श्री. सिंग यांच्या पथकाने रिसोड तालुक्यातील महागाव येथील माधव गायकवाड यांच्या नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली व झालेल्या पीक नुकसानीची माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली. श्री. गायकवाड यांनी ३ हेक्टरमध्ये सोयाबीन...