· मौखिक तपासणी, नेत्र चिकित्सा कक्षाचे उद्घाटन वाशिम , दि . ०२ : तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या कर्करोगाने दरवर्षी अनेकांचा मृत्यू होत आहे. तंबाखू सेवन आणि त्यामुळे होणाऱ्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मौखिक आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत ३० वर्षांवरील व्यक्तींची मौखिक तपासणी व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष महिमेचा तसेच मोतीबिंदुमुक्त महाराष्ट्र अभियानाचा शुभारंभ आज खासदार भावना गवळी व आमदार राजेंद्र पाटणी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आयोजित कार्यक्रमात झाला. यावेळी वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती सुधीर गोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, वाशिमचे उपनगराध्यक्ष रुपेश वाघमारे, वाशिम नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा समितीचे सभापती राहुल तुपसांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, जिल्हा आर...