वृक्ष लागवड, संवर्धनासाठी पुढाकार घ्या - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी
· ४ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम पूर्वतयारी आढावा · प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावण्याचे आवाहन · सात दिवस चालणार वृक्ष लागवड महोत्सव वाशिम , दि . ३० : वृक्षांचे प्रमाण कमी होत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्यामुळे शासनामार्फत ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत यावर्षी राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यानुसार वाशिम जिल्ह्याला ५ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून प्रशासनाने उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजेच ५ लाख २२ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील नागरिक, स्वयंसेवी संस्थानीही पुढाकार घेऊन वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज केले. ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, मंगरूळपीरचे उपविभागीय अ...