नगरपरिषद निवडणुकांमध्ये आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणार - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी
· पूर्व तयारीच्या अनुषंगाने पत्रकारांशी संवाद · निवडणूक सनियंत्रण समिती स्थापन होणार · नोडल अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या वाशिम , दि . १९ : जिल्ह्यातील तीन नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्यासाठी दिनांक १७ ऑक्टोंबर २०१६ पासून आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यातील तीनही नगरपरिषद क्षेत्रात या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून यासाठी निवडणूक सनियंत्रण समिती स्थापन करण्यासह इतर उपाययोजना करणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. याप्रसंगी वाशिमचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संदीपान सानप व मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शेटे, नगरपालिका प्रशासन विभागाचे श्याम जोशी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील वाशिम, कारंजा व मंगरूळपीर या तीन नगरपरिषदांसाठी २७ नोव्हेंबर २०१६ रोजी मतदान होणार आहे. याकरिता द...