मतदारांनो ! मतदानाचा हक्क पार पाडा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात!
मतदारांनो ! मतदानाचा हक्क पार पाडा
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.
जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क
लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात!
वाशिम,दि.२० नोव्हेंबर (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजेपासून मतदान प्रक्रियेस उत्साहात सुरुवात झाली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी लॉयन्स विद्यानिकेतन मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
मतदारांनो ! मी मतदान केले. आपणही राष्ट्रहिताच्या दृष्टीने मतदानाचा हक्क पार पाडावा.असे आवाहन केले.
यावेळी श्रीमती बुवनेश्वरी एस यांनी मतदान केंद्रातील केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्याशी संवाद साधुन मतदान प्रक्रियेबाबतची माहिती घेतली. तसेच मतदानासाठी आलेल्या मतदारांशी देखील त्यांनी संवाद साधत मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी मतदान केंद्रावर युवा मतदारासह ज्येष्ठ मतदार आणि महिला मतदार देखील उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसून आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सेल्फी सुद्धा काढला.आणि मतदारांसमवेत सेल्फी काढून उपस्थित मतदारांचा उत्साह वाढविला.
****
Comments
Post a Comment