निवडणूक निरीक्षक (सामान्य) अनिलकुमार झा यांची माध्यम कक्ष आणि सी-व्हिजील कक्षास भेट
निवडणूक निरीक्षक (सामान्य) अनिलकुमार झा यांची माध्यम कक्ष आणि सी-व्हिजील कक्षास भेट
वाशिम,दि.२८ ऑक्टोबर (जिमाका) जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेस अधिक पारदर्शक बनवण्यासाठी सामान्य निवडणूक निरीक्षक अनिलकुमार झा यांनी जिल्ह्यातील नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतल्यानंतर जिल्हा माहिती कार्यालयातील माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या (एमसीएमसी) माध्यम कक्षास भेट दिली. या भेटीदरम्यान, जिल्हा माहिती अधिकारी यासेरोद्दीन काझी यांनी अनिलकुमार झा यांना एमसीएमसी समितीच्या माध्यमातून चालणाऱ्या विविध कार्यांचे आणि माध्यम कक्षात होणाऱ्या कामकाजाची तपशीलवार माहिती दिली. यामध्ये पेड न्यूज, सोशल मीडिया अहवाल, जाहिरातीचे अहवाल तसेच इतर अनुषंगिक कामांची माहिती दिली.
यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., अप्पर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, सिव्हिजीलचे नोडल अधिकारी आणि कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखेडे, तसेच निवडणूक नायब तहसीलदार श्री. काळे यांच्यासह माध्यम कक्षात कार्यरत कर्मचारी उपस्थित होते.
या भेटीच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि शिस्तबद्धता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि तंत्रांचा आढावा घेण्यात आला.
Comments
Post a Comment