प्रत्येक शेतकरी' उत्पादक कंपनीमध्ये समाविष्ट होण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे प्रकल्प संचालक अनिसा महाबळे फलोत्पादन पिकावरील किड व रोग सर्वेक्षण एकदिवसीय प्रशिक्षण उत्साहात संपन्न
'प्रत्येक शेतकरी' उत्पादक कंपनीमध्ये समाविष्ट होण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे प्रकल्प संचालक अनिसा महाबळे फलोत्पादन पिकावरील किड व रोग सर्वेक्षण एकदिवसीय प्रशिक्षण उत्साहात संपन्न वाशिम,दि.२१ जून (जिमाका) प्रत्येक शेतकरी खातेदार हा शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये समाविष्ट झाला पाहिजे. यासाठी कृषी विभागातील प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी केले. बहुपीक पद्धतीचा अवलंब करून व जलपातळी वाढीच्या उपायोजना करण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होऊन एकत्रित कामे केल्यास लवकरच सिंचन क्षेत्रामध्ये भरीव वाढ होईल तसेच शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. फलोत्पादन पिकावरील किड व रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) सन २०२४-२५ अंतर्गत किड व रोग सर्वेक्षण चमुचे एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानावरून श्रीमती महाबळे बोलत होत्या. यावेळी प्रमुख मार्गदर्शक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरिफ शाह,कृषी विज्ञा...