देगाव शाळेतील बाधित विद्यार्थ्यांची सर्वोतपरी काळजी घेण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना
· पालकांनी काळजी न करण्याचे आवाहन वाशिम दि. २५ : रिसोड तालुक्यातील देगाव येथील शाळेतील कोरोना बाधित आढळलेल्या सर्व २२९ विद्यार्थ्यांची सर्वोतोपरी काळजी घेवून त्यांना आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्याकडून दूरध्वनीद्वारे कोरोना बाधित विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत माहिती जाणून घेतली. तसेच सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोरोनाची कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत , त्यामुळे पालकांनी काळजी करू नये , असे आवाहन त्यांनी केले. देगाव येथील निवासी शाळेतील ४ शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी आणि वसतिगृहात राहणारे २२९ विद्यार्थी कोरोना बाधित आले आहेत. या विद्यार्थ्यांना सर्व आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. याठिकाणी डॉक्टरांचे पथक , रुग्णवाहिका उपलब्ध ठेवावी. विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही , याची दक्षता घ्यावी. एखाद्या विद्यार्थाला काही मध्यम अथवा गंभीर लक्षणे दिसल्यास त्याला तातडीने ...