‘मुद्रा’मुळे रणजित झाला स्वावलंबी…
बेरोजगारीचे प्रमाण आज प्रचंड वाढले आहे. या वाढत्या बेरोजगारीमुळे सर्वांनाच रोजगार उपलब्ध करून देणे आज कठीण झाले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून बेरोजगार व गरजू व्यक्ती हा स्वावलंबी व्हावा, हे पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात साकारतांना दिसत आहे. वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर येथील रणजित देवळे हा शिक्षीत तरुण मुद्रा योजनेच्या माध्यमातून स्वावलंबी झाला आहे. रणजित... तसा भूमिहीन. घरी वडिलोपार्जित शेती नसल्यामुळे रणजितने ग्रामपंचायत जवळ सरकारी जमिनीवर केवळ १० हजार रुपयांची गुंतवणूक करून सन २००० मध्ये छोटे किराणा दुकान थाटून व्यवसायाला सुरुवात केली. आई, वडील, पत्नी व एका मुलासह संसाराचा गाडा चालविण्याची जबाबदारी रणजितवर आली. निर्व्यसनी असलेला रणजित सुस्वभावी असल्यामुळे ग्राहक देखील त्याच्या दुकानातून किराणा खरेदी करू लागले. दिवसाला या व्यवसायातून त्याला सुमारे १८० रुपये नफा मिळू लागला. केवळ याच व्यवसायात समाधान न मानता काहीतरी जोडधंदा केला पाहिजे, हा विचार सतत रणजितच्या मनात घर करू लागला. पार्डी टकमोर हे गाव परिसरातील ८ ते १० गावांची ...