मानवाधिकाराची प्रभावी अंमलबजावणी करा - श्रीमती एस. जलजा
वाशिम , दि . २८ : प्रत्येक व्यक्तीला त्याचे अधिकार राज्यघटनेने दिले आहे. त्याच्या अधिकाराचे हनन होणार नाही, याची दक्षता सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी घ्यावी. प्रत्येक घटकासाठी यंत्रणेने काम करतांना मानवाधिकाराची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे मत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या विशेष प्रतिनिधी श्रीमती एस. जलजा यांनी व्यक्त केल्या. २८ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित आढावा बैठकीत श्रीमती जलजा बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखेडे , निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस , अपर पोलीस अधिक्षक स्वप्ना गोरे , रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनिल कोरडे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला बालकल्याण) नितीन मोहुर्ले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणी पुरवठा) सुदाम इस्कापे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) नितीन माने , शिक्षण अधिकारी (माध्य.) तानाजी नरळे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीमती जलजा पुढे म्हणाल्या , जिल्ह्याचा मानव व...