समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेची चित्ररथाद्वारे जनजागृती
· जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते शुभारंभ वाशिम , दि . ०५ : राज्य शासनाने सुरु केलेल्या समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेची तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी सहाय्यक वन संरक्षक अशोक वायाळ, उप अभियंता बी. बी. बलखंडे, नायब तहसीलदार घनश्याम डाहोरे, सहाय्यक लेखा अधिकारी सीमा वानखेडे, कार्यक्रम व्यवस्थापक एस. जी. कदम, सचिन राऊत आदी उपस्थित होते. समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेची तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कोणती कामे करता येतील, तसेच ही कामे घेण्यासाठी अर्ज कोणाकडे सादर करावा यासह इतर माहिती या चित्ररथाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. दि. ५ ते २४ एप्रिल २०१८ या कालावधीत ग्रामीण भागात हा चित्ररथ फिरणार आहे. राज्य शासनाची वृक्ष लागवड मोहीम व महाराष्ट्र हरित सेना नोंदणीविषयी सुध्दा ...