'आहोत आम्ही मतदार, मतदान हक्क अवश्य बजावणार ’ मतदान जनजागृती रॅलीने वाशिमकरांचे लक्ष वेधले जिल्हाधिकाऱ्यांकडून रॅलीला हिरवा झेंडा; विद्यार्थ्यांच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमले
‘आहोत आम्ही मतदार, मतदान हक्क अवश्य बजावणार!’ मतदान जनजागृती रॅलीने वाशिमकरांचे लक्ष वेधले जिल्हाधिकाऱ्यांकडून रॅलीला हिरवा झेंडा; विद्यार्थ्यांच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमले वाशिम, दि. २० नोव्हेंबर (जिमाका) नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका २०२५ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत . या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदान जनजागृतीवर मोठा भर देण्यात येत आहे. वाशिममध्ये आज भव्य मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. ‘आहोत आम्ही मतदार, मतदान हक्क अवश्य बजावणार’, ‘तुमचे मतदान तुमचा अधिकार’, ‘सुयोग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करा’ अशा प्रभावी घोषणांनी रॅलीने शहराचे लक्ष वेधून घेतले. रॅलीची सुरुवात नगरपरिषद कार्यालयातून झाली. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत रॅलीची सुरुवात होताच परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांच्या सहभागातून लोकशाही बळकट व्हावी हा संदेश देत रॅली पुढे सरकत मार्गस्थ झाली. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार निलेश पळसकर, न.प. मुख्याधिकारी निलेश गायकवाड, स्वीप...