Posts

Showing posts from August, 2024

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला लखपती दिदींशी संवादआर्थिक सक्षमतेबरोबर आत्मसन्मान मिळाल्याची लखपती दीदींची भावना

Image
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला लखपती दिदींशी संवाद आर्थिक सक्षमतेबरोबर आत्मसन्मान मिळाल्याची लखपती दीदींची भावना जळगाव,दि.२५ ऑगस्ट (जिमाका) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जळगाव येथे देशातील निवडक लखपती दीदिंशी शी संवाद साधला. लखपती दीदी योजनेमुळे त्यांच्या जीवनमानात झालेल्या बदलाविषयी त्यांनी संवादाच्या माध्यमातून जाणून घेतले. "लखपती दीदी योजनेमुळे महिला बचतगटांना मिळालेल्या आर्थिक, व्यावसायिक सहाय्य व प्रशिक्षणामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो. त्याचबरोबर आम्हाला आत्मसन्मान ही मिळाला."अशी भावना लखपती दीदींनी यावेळी व्यक्त केली. येथील प्राइम इंडस्ट्रियल पार्क मैदानावर झालेल्या लखपती दिदी संमेलनापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील निवडक अशा ८० लखपती दीदींशी संवाद साधला. या लखपती दिदी संवाद कार्यक्रमात देशातील वेगवेगळ्या राज्यांतील बॅंक सखी दिदी, ड्रोन दीदी, पशु दिदी, कृषी दिदी म्हणून नावारूपाला येऊन लखपती झालेल्या महिला उपस्थित होत्या. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह...

आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य* – *प्रधानमंत्री नरेंद्र मोदी*

Image
*आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य*  – *प्रधानमंत्री नरेंद्र मोदी* ▪️ अडीच हजार कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण ▪️पाच हजार कोटींची बॅंक कर्जे वितरित ▪️लखपती दीदी संमेलनाला हजारो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  जळगाव, दि. २५ : भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून २०४७ पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांच्या सर्वांगीण प्रगतीमुळे आपण विकसीत भारताचे ध्येय नक्कीच गाठू, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केला. स्वयंसहायता गटाला आर्थिक ताकद देतानाच गरीबांसाठी घरकूल बांधण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. आतापर्यत चार कोटी घरकूल वाटप करण्यात आली असून आगामी काळात ३ कोटी घरे बांधण्यात येतील, त्यात महिलांचे नाव प्रथम असेल, असे त्यांनी सांगितले.  जळगाव येथील प्राईम इंडस्ट्रीअल पार्क येथे (विमानतळ परिसर) देशपातळीवरील लखपती दीदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रधानमं...

गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी डॉ. अनिल कावरखे जिल्हा सल्लागार समितीची बैठक उत्साहात"मुलींच्या जन्माचे स्वागत करा"चा जागर

Image
गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी            डॉ. अनिल कावरखे  जिल्हा सल्लागार समितीची बैठक उत्साहात "मुलींच्या जन्माचे स्वागत करा"चा जागर वाशिम दि.२१ ऑगस्ट (जिमाका) सोनोग्राफीसारख्या तंत्राचा वापर करून गर्भ लिंग जाणून घेण्यासाठी काहीजण करीत असल्याचे आजही दिसून येते. मुलींचा जन्मदर वाढविणे ही काळाची गरज आहे.जिल्ह्यातील कोणत्याही सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंगनिदान चाचणी होणार नाही, यासाठी सर्व सोनोग्राफी सेंटरने दक्षता घेऊन गर्भलिंगनिदान चाचणी प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.असे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अनिल कावरखे यांनी दिले.          २० ऑगस्ट रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात पी.सी.पी.एन.डी.टी जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सभेत श्री कावरखे बोलत होते. यावेळी ‌‌डॉ .अलका मकासरे, डॉ . जयकिशन बाहेती, डॉ. अपर्णा पुपलवाड, राजेश गोरूले, जिल्हा माहिती अधिकारी यासिरोद्दीन काझी यांच्यासह इतरही समिती सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.    ...

उमेद अभियान बचतगटातील महिला मुख्यमंत्र्यांना पाठविणार एक कोटी राख्या विविध योजना आणल्याबद्दल महिलांनी व्यक्त केली कृतज्ञता

Image
उमेद अभियान बचतगटातील महिला मुख्यमंत्र्यांना पाठविणार एक कोटी राख्या विविध योजना आणल्याबद्दल महिलांनी व्यक्त केली कृतज्ञता मुंबई, दि. १७ - राज्य शासनाने महिलांसाठी विविध कल्याणकारी योजनांसह 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरु केली आहे. या योजनेचा पहिल्या दोन महिन्यांचा लाभ राज्यातील पात्र भगिनींना डिबीटीद्वारे नुकताच वितरीत करण्यात आला. या योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. या निर्णयाचा फायदा अडीच कोटीहून अधिक महिलांना होणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना वर्षातून तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने महिलांसाठी कल्याणकारी योजना सुरू करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणले आहे. यामुळे राज्यातील बचतगट चळवळीतील उमेद अभियानातील महिला ह्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक कोटी राख्या पाठविणार आहेत. राज्यातील बचत गटाच्या महिलांमार्फत राखी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. राज्यातील ४० हजार गावांतून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना राखी पाठविण्यात येणार आहे. शासनाने आणलेल्या नवीन योजनांमुळे सर्वत्र आनंदाचे व...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ; बहिणींच्या आनंदसोहळ्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी

Image
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ; बहिणींच्या आनंदसोहळ्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी लाडक्या भावाकडून रक्षाबंधानाची ओवाळणी मिळाल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण लाडक्या बहिणींच्या जीवनात सुखाचे-आनंदाचे क्षण यावे हीच या भावाची इच्छा-मुख्यमंत्री पुणे, दि. १७: महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनी फुललेला शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर, महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा… अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा अहेर मिळणार आहे, अशा भावपूर्ण शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछपत्रपती क्रीडानगरी येथे झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय राज...

महिलांच्या सर्वांगीण बळकटीकरणासाठी शासन खंबीरपणे पाठीशी उभे जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे

महिलांच्या सर्वांगीण बळकटीकरणासाठी शासन खंबीरपणे पाठीशी उभे         जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाचे थेट प्रक्षेपण उत्साहात  लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद वाशिम,दि.१७ ऑगस्ट (जिमाका) महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासन विविध योजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून माझी लाडकी बहिण ही योजना आहे. वाशिम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आहे. जिल्ह्यातील यंत्रणाचं काम पाहता हा ठपका लवकरच पुसल्या जाणार आहे. प्रत्येक यंत्रणा चांगले काम करत आहे. कुपोषण निर्मूलनात जिल्हा अव्वल आहे. माझी लाडकी बहिण योजना पुढे नेण्यासाठी शासन खंबीरपणे उभे आहे.महिलांच्या सर्वांगीण बळकटीकरणासाठी शासनासोबतच मी पण लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले.        मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या शुभारंभाच्या अनुषंगाने शनिवार, आज दि. १७ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात थेट प्रक्षेपणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ...