पावसाळ्याच्या काळात संपर्क, संवाद साधून योग्य समन्वय ठेवा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे
पावसाळ्याच्या काळात संपर्क, संवाद साधून योग्य समन्वय ठेवा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे एकबुर्जी प्रकल्पावर दिले मान्सुनपूर्व प्रशिक्षणाचे धडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा पुढाकार वाशिम, दि. २८ (जिमाका) : पावसाळ्यातील परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वांनी आपापसात योग्य समन्वय ठेवून संपर्क, संवाद ठेवावे जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत आपत्तीमध्ये हानी होणार नाही हे बघावे. असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले. वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पावर आज २८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशिमच्या वतीने एक दिवशीय मान्सूनपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री . घुगे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आधिकारी शाहू भगत, नायब तहसीलदार श्री. नप्ते, कारंजा ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रविण खंडारे, अग्नीशमन अधिकारी अक्षय तिरपुडे, पोलिस उपनिरीक्षक श्री झुंगे, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक अ...