दिवाळी आनंदात पण साधेपणाने साजरी करा, आरोग्याची काळजी घ्या !
· वाशिम जिल्हा प्रशासनाचे आवाहन वाशिम , दि. १३ (जिमाका) : वर्षभरात साजऱ्या होणाऱ्या विविध सणापैकी दिवाळी हा एक महत्त्वाचा आणि आनंदाचा सण. हा सण साजरा करण्यासाठी बाहेरगावी असलेली मंडळी आपल्या गावी परत येऊन कुटुंबासोबत एकत्रितपणे हा सण साजरा करतात. यावर्षी मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग सुरुच आहे. कोरोना संसर्गाच्या काळात यंदाची दिवाळी प्रत्येकाने आनंदात पण साधेपणाने साजरी करतांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी व प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते आणि जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी जिल्हावासीयांना केले आहे. यंदाच्या दिवाळीत खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत जातांना प्रत्येकाने दक्षता घ्यावी. सामाजिक अंतर ठेवावे. कोरोनाचा संसर्ग होणार नाही यासाठी प्रत्येकाने तोंडावर मास्क लावावे. कोणत्याही वस्तूला हात लावल्यानंतर हाताला सॅनीटायझर लावावे किंवा हात साबणाने स्वच्छ...