पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले लांडगे कुटुंबियांचे सांत्वन वाशिम , दि . १३ : राज्याच्या गृह (शहरे), सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी व न्याय, संसदीय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील आत्महत्या केलेल्या दत्ता लांडगे या शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी लांडगे कुटुंबियांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच या कुटुंबियांना उत्पन्नाचा शाश्वत स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार विजय जाधव, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपविभागीय अधिकारी संदीप सानप, तहसीलदार सोनाली मेटकरी आदी उपस्थित होते. यावेळी दत्ता लांडगे यांचे वडील आत्माराम लांडगे, आई सत्यभामा व पत्नी सोनाली यांनी पालकमंत्री डॉ. पाटील यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच दत्ता लांडगे यांच्या पत्राची शासनाने दखल घ्यावी, अशी मागणी केली. यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. पाटील म्हणाले की, दत्ता ला...
Posts
Showing posts from September, 2015
तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होणार- जिल्हाधिकारी द्विवेदी
- Get link
- X
- Other Apps
तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होणार- जिल्हाधिकारी द्विवेदी · अफवांना बळी न पडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन · जिल्ह्यातील २४ केंद्रांवर होणार परीक्षा · परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू वाशिम , दि . १० : जिल्हाधिकारी व अधिनस्त क्षेत्रीय आस्थापनेवरील तलाठी संवर्गाची लेखी परीक्षा दिनांक १३ सप्टेंबर २०१५ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यातील विविध २४ केंद्रांवर होत आहे. परीक्षा प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे होणार आहे. नोकरीस लावून देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्यांपासून तसेच तोतयागिरीपासून परीक्षार्थींनी सावध रहावे. याबाबत कोणत्याही व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करू नयेत, फसवणूक झाल्यास जिल्हा निवड समिती जबाबदार राहणार नाही, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कळविले आहे. वाशिम येथील जवाहर नवोदय विद्यालय, राजस्थान आर्य कॉलेज, श्री. शिवाजी हायस्कूल, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, बाकलीवाल विद्यालय, श्रीमती मुलीबाई चरखा इंग्लिश स्कूल, हॅपी फेस...
कोयासन विद्यापीठात अभूतपूर्व उत्साहात पुतळ्याचे अनावरण
- Get link
- X
- Other Apps
कोयासन विद्यापीठात अभूतपूर्व उत्साहात पुतळ्याचे अनावरण डॉ. बाबासाहेबांना 125व्या जयंतीवर्षात लंडनपासून टोकियोपर्यंत वैश्विक मानवंदना मुंबई, दि. 10 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे यंदा 125वे जयंती वर्ष साजरे करण्यात येत असतानाच त्यांना आज महाराष्ट्र शासनातर्फे सातासमुद्रापार झालेल्या अभूतपूर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून जणू वैश्विक मानवंदना देण्यात आली. जपानच्या कोयासन विद्यापीठात अपूर्व उत्साहात झालेल्या अनोख्या कार्यक्रमात बाबासाहेब ांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमं त्री देवेंद्र फडणवीस यां च्या हस्ते करण्यात आले . बाबासाहेबांचे वास्तव्य असलेली इंग्लंडमधील वास्तू खरेदीची प्रक्रिया मार्गी लावतानाच जपानमधील पुतळ्याच्या अनावरणातून राज्यघटनेच्या थोर शिल्पकाराच्या गौरवाचे एक चक्र जणू राज्य शासनाने पूर्ण केले आहे. महाराष्ट्र शासनातर्फे यंदा डॉ. बाबासाहेबांचे 125वे जयंती वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत आहे. या वर्षात इंदू मिलच्या जागेवरील स्मारकाच्या उभारणीचा प्रश्न सरकारने मार्गी लावला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी बाबासाहेबांचे लंडनमधील वास्तव्य ...