Posts

Showing posts from 2026

श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० वा शहीदी समागम कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी लाखो भाविकांची अलोट गर्दी

Image
श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० वा शहीदी समागम कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी लाखो भाविकांची अलोट गर्दी ‘बोले सो निहाल,सत श्री अकाल’च्या जयघोषात भाविकांनी घेतले पावन दर्शन नवी मुंबई, दि. ०१ : ‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमात दुसऱ्या दिवशीही लाखो भाविकांची अलोट गर्दी झाली आहे.सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.“वाहे गुरु” व “बोले सो निहाल,सत श्री अकाल” च्या जयघोषात श्री गुरू ग्रंथ साहिबजी यांचे पावन दर्शन घेतले जात आहे. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता.अखंड कीर्तन, गुरुवाणी आणि प्रार्थनेमुळे वातावरण अधिकच आध्यात्मिक झाले होते. लंगर व सोयी-सुविधांची उत्तम व्यवस्था भाविकांच्या सोयीसाठी आयोजकांकडून चोख नियोजन करण्यात आले आहे.प्रशासन, स्वयंसेवक आणि विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने कार्यक्रम सुरळीत सुरू आहे.देशातील विविध राज्यातून आलेल्या सर्व धर्माचे भाविक शांतता,शिस्त व श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेत आहेत. भाविकांसाठी लंगरची व...

गृहमंत्री अमित शाह यांनी दिली लंगरसेवा**‘हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रमात भक्तिभावाचा अनोखा संदेश*

Image
*गृहमंत्री अमित शाह यांनी दिली लंगरसेवा* *‘हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रमात भक्तिभावाचा अनोखा संदेश*  नवी मुंबई, दि. २८ (विमाका):-  गृहमंत्री अमित शाह यांनी खारघर, नवी मुंबई येथे आयोजित ‘हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रम दरम्यान स्वतः लंगरमध्ये संत महंताना भोजन वाढून सेवा दिली.   ‘सेवा हीच खरी श्रद्धा’ या शीख परंपरेचा आदर्श त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भोजन वाढून लंगर सेवा दिली.             कार्यक्रमस्थळी सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड लंगर सुरू असून सर्वधर्मीय भाविकांसाठी विनामूल्य भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आठ ठिकाणी सुरू असलेल्या लंगरमध्ये हजारो स्वयंसेवक सेवा बजावत आहेत. भाई जैताजी लंगर सेवा, राधास्वामी ब्यास लंगर सेवा, बाबा मक्खन शाह लबाना लंगर सेवा, संत सेवालाल महाराज लंगर सेवा, बाबा दीप सिंघा ब्यास लंगर सेवा, भगवान झुलेलालजी लंगर सेवा, भाई मतीदासजी लंगर सेवा या आठ सेवादार लंगरमध्ये पहिल्या दिवशी लाखो भाविकांनी लंगरचा लाभ घेतला, तर दुसऱ्या दिवशी हा प्रतिसाद अधिक वाढला असल...

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्यागात देश सदैव ऋणात* – *केंद्रीय गृहमंत्री अमित शाह*

Image
*श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्यागात देश सदैव ऋणात*  – *केंद्रीय गृहमंत्री अमित शाह* नवी मुंबई, दि. ०१ : “हिंद दी चादर” म्हणून संपूर्ण देशात आदराने ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे शहिदत्व हे केवळ शीख समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी आपले शीश अर्पण केले. देश त्यांच्या या त्यागाचा सदैव ऋणी राहील, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने नवी मुंबईतील खारघर येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात गृहमंत्री शाह बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अखिल भारतीय धर्मजागरणचे प्रमुख शरदराव ढोले, शहिदी समागम समितीचे मार्गदर्शक बाबा हरनाम सिंह जी, मुखी, दमदमी टकसाल, प्रधान संत समाज, बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज, राज्यस्तरीय समनव्य समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, राज्यस्...

*गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हिंद दि चादर कार्यक्रमाचे खारघरमध्ये भव्य आयोजन*

Image
*गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हिंद दि चादर कार्यक्रमाचे खारघरमध्ये भव्य आयोजन* *शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश करणार ; नवी मुंबईत त्यांच्या नावाने रुग्णालय उभारणार*  –*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* नवी मुंबई, दि. १ : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेली शहादत ही जगाच्या इतिहासातील अद्वितीय घटना आहे. त्यांच्या बलिदानाची गाथा केवळ एका कार्यक्रमापुरती मर्यादित न राहता ती पुढील पिढीपर्यंत पोहचली जावी. यासाठी शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश केला जाणार आहे. तसेच नवी मुंबई परिसरात त्यांच्या नावाने रुग्णालय उभारण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने खारघर येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रम...

हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात ध्वनिचित्रफितद्वारे प्रधानमंत्र्यांनी दिला संदेश

Image
हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात ध्वनिचित्रफितद्वारे प्रधानमंत्र्यांनी दिला संदेश *गुरु तेग बहादूरांच्या शौर्याची परंपरा नवी पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी सेवा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी* खारघर, दि. १ – महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहिदी समागमाच्या माध्यमातून आपण महान परंपरेचे साक्षीदार होत आहोत. गुरूंनी दिलेला त्याग आणि सामाजिक एकतेचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे, असा संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ध्वनिचित्रफितद्वारे दिला. अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने खारघर येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश ध्वनिचित्रफितद्वारे दाखविण्यात आला. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सांगितले की, गुरूंनी त्यागाची पराकाष्ठा केली. त्या काळात समाजातील सर्व घटक एकत्र उभे राहिले. सत्य आणि संस्कृतीसाठी ठाम राहण्याची प्रेरणा समा...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्री. संत सेवालाल महाराज, संत शिरोमणी रामराव बापू महाराज व माता जगदंबेच्या चरणी नतमस्तक

Image
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्री. संत सेवालाल महाराज, संत शिरोमणी रामराव बापू महाराज व माता जगदंबेच्या चरणी नतमस्तक  वाशिम,  (जिमाका) श्री. संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि.(१४) रोजी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे भेट देत संत सेवालाल महाराज, संत शिरोमणी रामराव बापू महाराज तसेच माता जगदंबेच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड,आमदार धर्मगुरु बाबु सिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत जितेंद्र महाराज,महंत शेखर महाराज,महंत सुनील महाराज, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतांच्या विचारांचा समाज घडविण्यात मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. सत्य, अहिंसा, सेवा आणि सामाजिक समतेचा संदेश संत सेवालाल महाराज व संत रामराव बापू महाराज यांनी दिला असून, त्यांच्या विचारांवर चालत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचा शासनाचा प्...

बंजारा समाजाच्या कायम पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहरादेवीत उद्योग निर्मितीला चालना देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
बंजारा समाजाच्या कायम पाठीशी        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहरादेवीत उद्योग निर्मितीला चालना देणार          उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भव्य उद्घाटन वाशिम, (जिमाका)  संत सेवालाल महाराज यांनी समाजाला स्वाभिमान, सदाचार आणि सेवाभावाचा मार्ग दाखविला. त्यांचे विचार आजच्या काळात अधिक प्रेरणादायी आहेत. पोहरादेवी हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे. पर्यटन विकास हा केवळ आर्थिक प्रगतीपुरता मर्यादित नसतो, तर तो स्थानिक संस्कृती, परंपरा आणि मूल्यांचे संवर्धन करणारा असतो. पोहरादेवी परिसराचा नियोजनबद्ध विकास करताना श्रद्धेचा सन्मान राखून सुविधा अधिक सक्षम करण्यात येईल. बंजारा समाजाच्या कायम पाठीशी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दृरदृश्यप्रणालीव्दारे संदेश देतांना मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संत ...

जनतेशी थेट संवाद साधून विकासाभिमुख धोरणांना दिशा देणारा कुटूंब प्रमुख हरपला_कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

Image
जनतेशी थेट संवाद साधून विकासाभिमुख धोरणांना दिशा देणारा कुटूंब प्रमुख हरपला _कृषी मंत्री दत्तात्रय भरणे राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माझे मार्गदर्शक आणि कुटूंबप्रमुख असलेले अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी माझ्यासाठी असह्य वेदना देणारी आहे. आज महाराष्ट्राने केवळ एक अनुभवी नेता नाही, तर जनतेशी थेट संवाद साधणारा, विकासालाच आपला धर्म मानणारा एक कर्तव्यदक्ष लोकनेता गमावला आहे. ही वेदना कुटुंबातली आहे…आणि हे दुःख शब्दांच्या पलीकडचं आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. पवार कुटुंबीयांना आणि आम्हा सर्वांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो, अशा शब्दात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भावपूर्ण श्रध्दांजली व्यक्त केली. व्यक्त व्हायला शब्द अपुरे पडत आहेत. एखादा नेता नाही, तर घरातला माणूस हरपल्यासारखं वाटत आहे. अजितदादा पवार म्हणजे आमच्यासाठी केवळ नेतेच नव्हते तर ते आधार होते, मार्गदर्शक होते, कठीण वेळी पाठीशी उभं राहणारं कुटुंबातलं माणूस होते. आज त्यांच्या जाण्याने मनात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती शब्दांत मांडणं कठीण आहे. नेहमी धीर देणार...

घनकचरा विलिनीकरण प्रक्रिया केंद्राचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन

Image
घनकचरा विलिनीकरण प्रक्रिया केंद्राचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन वाशिम,  (जिमाका) शहर स्वच्छता, पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत वाशिम येथे घनकचरा विलिनीकरण प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन आज दि.(२६) रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. 'फ्री ऑफ कॉस्ट ' तत्वावर चालविला जाणारा हा विलगीकरणाचा प्रथम प्रकल्प आहे. यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी  निलेश गायकवाड, नगरपालिका प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, स्वच्छता कर्मचारी व नागरिक मोठ्या  उपस्थित होते.  उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री ना. भरणे यांनी केंद्राची पाहणी करून कार्यपद्धतीची राम डोरले यांच्याकडून माहिती जाणून घेतली. पालकमंत्री म्हणाले की, घनकचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण, प्रक्रिया व पुनर्वापर केल्यास पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कमी करता येतो. हे केंद्र म्हणजे स्वच्छ भारत अभियानाला बळकटी देणारे महत्त्वाचे पाऊल असून, शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक शास्त्रशुद्ध पद्...

सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा विकास करुया पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे

Image
सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा विकास करुया    पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे  पोलीस कवायत मैदान येथे प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा वाशिम,  (जिमाका) जिल्ह्याचा प्रगतीचा प्रवास आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य होईल. आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास वाशिम जिल्हा महाराष्ट्रातील एक आदर्श जिल्हा बनू शकतो. आपल्या संविधानाच्या आदर्शांवर चालत, आपण विकासाची नवी शिखरे गाठूया. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करुया असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांनी केले.        आज दि.(२६) रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम येथील पोलीस कवायत मैदान येथे पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर ,जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अ...

तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे ३५० शालेय विद्यार्थ्यांच्या स्वरात दुमदुमली गुरबानी

Image
तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे  ३५० शालेय विद्यार्थ्यांच्या स्वरात दुमदुमली गुरबानी  हिंद दी चादर गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम   नांदेड, दि. २३ : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी  समागम वर्षाचे औचित्य साधून, पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड येथे एका भव्य आणि विशेष कीर्तन समागमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ३५० शालेय विद्यार्थ्यांनी एका सुरात केलेल्या श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 'शब्द गुरबानी'च्या गायनाने उपस्थितीतांना मंत्रमुग्ध केले. पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड बोर्डाद्वारे आयोजित हा कार्यक्रम संपन्न झाला.  हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचे  ३५० व्या शहीदी समागम वर्ष निमित्ताने, ३५० विद्यार्थ्यांनी त्यांना ही अनोखी स्वरांजली अर्पण केली. या कार्यक्रमास तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वाराचे  जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघजी, बोर्डाचे प्रशासक डॉ....

विशेष लेख : हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादूरजी : मनाचे श्लोक

Image
विशेष लेख :   हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादूरजी : मनाचे श्लोक   शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादूरजी यांना संपूर्ण भारतात "हिंद दी चादर" (भारताचे संरक्षक) म्हणून ओळखले जाते. त्यांचे स्थान केवळ शीख इतिहासातच नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आदराचे आहे. ते केवळ एक धार्मिक नेते नव्हते, तर मानवी सन्मान, श्रद्धा स्वातंत्र्याचे सर्वोच्च रक्षक होते. त्यांचे जीवन आणि कृती आपल्याला स्वतःच्या धर्मापलीकडे जाऊन मानवतेची मूल्ये कशी जपावीत, याबाबत शिकवते.   श्री गुरू तेग बहादूरजी असे योद्धे होते, की वयाच्या 14 व्या वर्षी मोगलांबरोबरच्या युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्य गाजवले. तलवारीने शत्रूस कंठस्नान घातले. म्हणून त्यांचे नाव तेग बहादूर ठेवले गेले. तरीही पुढे अध्यात्मिक साधनेमुळे ते पूर्णपणे स्थिरमती बनले. सुख, दु:ख, हर्ष, खेद यापासून मुक्त, असे मुक्तामा बनले. त्यांना ठार मारण्यासाठी आलेल्या मारेकऱ्यासही त्यांनी क्षमा केली, केवढे हे त्यांचे औदार्य आणि मनाची ताकद.   श्री गुरू तेग बहादूरजी यांचे पुत्र शीख धर्मियांचे दहावे आणि अंतिम देहधारी गुरू श्री गुरू गोबि...

#हिंददीचादर श्री #गुरुतेगबहादूर जी यांच्या ३५० व्या #शहीदीसमागम कार्यक्रमानिमित्त नांदेड येथील मोदी मैदानावर श्री गुरुनानक देवजी यांच्या नावाने उभारण्यात आलेले प्रवेशद्वार #350thShaheedi #GuruTeghBahadurJi#hinddichadar#shahidisamagam #guruteghbahadursahibji #नांदेड

Image

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचे प्रेरणादायी विचार#हिंददीचादर #गुरुतेगबहादूर #प्रेरणादायीविचार #जीतआणिधैर्य #सकारात्मकविचार

Image

#हिंददीचादर#गुरुतेगबहादूर #शहीदीसमागम #350thShaheedi #GuruTeghBahadurJi#hinddichadar#shahidisamagam #guruteghbahadursahibji #नांदेड

Image
#हिंददीचादर #गुरुतेगबहादूर  #शहीदीसमागम  #350thShaheedi  #GuruTeghBahadurJi #hinddichadar #shahidisamagam  #guruteghbahadursahibji  #नांदेड

#हिंददीचादर#गुरुतेगबहादूर #शहीदीसमागम #350thShaheedi #GuruTeghBahadurJi#hinddichadar#shahidisamagam #guruteghbahadursahibji #नांदेड

Image

24 आणि 25 जानेवारी 2026स्थळ: मोदी मैदान, वाघाळा, नांदेड📍

Image

#हिंददीचादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त मोदी ग्राउंड, नांदेड -वाघाळा, नांदेड येथे ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन.🗓️ दिनांक: २४ आणि २५ जानेवारी २०२६⏱️ वेळ : सकाळी ८ ते रात्री १० पर्यंतया ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होवू या..!#हिंददीचादर#गुरुतेगबहादूर #शहीदीसमागम #350thShaheedi #GuruTeghBahadurJi#hinddichadar#shahidisamagam #guruteghbahadursahibji #नांदेड

Image

ऐतिहासीक ‘जफरनामा’ची हस्तलिखित प्रत छत्रपती संभाजीनगर येथील भाई दयासिंग, भाई धरमसिंग गुरुद्वाऱ्यात संग्रहित

Image
हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांचा ३५० वा शहीदी समागम ऐतिहासीक ‘जफरनामा’ची हस्तलिखित प्रत छत्रपती संभाजीनगर  येथील भाई दयासिंग, भाई धरमसिंग गुरुद्वाऱ्यात संग्रहित छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका)- सामाजिक एकोपा, धर्म रक्षणासाठी शहादत देणाऱ्या गुरु तेग बहादुरांना हिंद दी चादर अशी पदवी आहे. त्यांचे जीवन हे समाजाच्या रक्षणासाठी वाहिले. तत्कालीन शास्त्यांकडून समाजावर होत असलेल्या अन्यायपूर्ण वागणुकीचा सामोपचार ज्या पत्राने झाला ते पत्र ‘जफरनामा’ म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. हाच जफरनामा तत्कालिन मुगल बादशाह औरंगजेब यांच्याकडे देण्यासाठी म्हणून छत्रपती संभाजीनगर या शहरात आणला गेला होता. आजही त्याची हस्तलिखित प्रत येथील भाई दयासिंग, भाई हरिसिंग गुरुद्वाऱ्यात संग्रहित आहे.  एक प्रकारे मानव मुक्तीचा जाहीरनामा असलेला हा जफर नामा म्हणजे गुरु तेग बहादुर साहेब यांचे सुपूत्र गुरु गोविंद सिंग यांनी मुगल बादशाह औरंगजेबाला लिहिलेले एक पत्र होय.  नांदेड येथे येत्या २४ व २५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन...

Good news for fellowship ! "Hind-di-Chadar" Shri Guru Teg Bahadur Sahib Ji announced special trains for 350th Martyrdom Samagam !

Image
Good news for fellowship ! "Hind-di-Chadar" Shri Guru Teg Bahadur Sahib Ji announced special trains for 350th Martyrdom Samagam ! To facilitate the sangat of Shri Guru Teg Bahadur Sahib Ji's historic "Hind-di-Chadar" 350th Martyrdom Samagam, Maharashtra Government and Indian Railways have organized Special Trains (Special Trains) for Hazoor Sahib Nanded from major cities of the country List of special trains: 🔹 Amritsar - Nanded - Charlapally (Train 04642/04641) 🔹 Chandigarh - Nanded (Train 04524/04523). 🔹 Delhi (NZM) - Nanded (Train 04494/04493). 🔹 Mumbai (LTT) - Nanded (Train 01041/01042) Tickets available at: IRCTC and Confirmtkt #hinddichadar #GuruTegBahadurSahib #guruteghbahadursahibji

"Hind di Chadar" Festival - only 3 days left !

Image
"Hind di Chadar" Festival - only 3 days left! "Hind Di Chadar", organized by Maharashtra Government and Minority Development Department, only 3 days left for Shri Guru Teg Bahadur Sahib Ji's 350th Martyrdom Samagam and Shri Guru Gobind Singh Ji's 350th Gurtagaddi Centenary Samagam. 🙏 You all are cordially invited to witness this historic moment. 📍 Location: Modi Maidan, Waghala - Nanded, Maharashtra.  Time is short, preparation is complete! #hinddichadar #GuruTegBahadurSahib #guruteghbahadursahibji

सेवा स्टॉलच्या माध्यमातून सेवेची सुवर्णसंधी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Image
सेवा स्टॉलच्या माध्यमातून सेवेची सुवर्णसंधी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले Ø “हिंद दी चादर” शहीदी समागमानिमित्त सेवाभावी संस्था व नागरिकांना आवाहन नांदेड, दि. २० जानेवारी:- नांदेड येथे दिनांक २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी “हिंद दी चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त भव्य विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून तसेच राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त नांदेड येथे उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर, कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी शहरातील विविध ठिकाणी सेवा स्टॉल्सची उभारणी करण्यात येत आहे. या सेवा स्टॉल्सवर भाविकांसाठी चहा, पाणी, नाश्ता, फलाहार आदी सुविधा निःशुल्क स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सेवाकार्यासाठी विविध सेवाभावी संस्था, व्यापारी व व्यावसायिक आस्थापना, उद्योजक, शासकीय कार्यालये, बँकिंग क्षेत्र तसेच सेवा देण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी नोंदणी केली आहे. अधिकाधिक भाविकांना उत्तम सेवा देता यावी यासाठी आणखी जास्तीत जास्त संस्था व नागरिकांनी पुढे याव...

श्री गुरु तेग बहादूर : मानवजातीचे खरे तारणहार

Image
श्री गुरु तेग बहादूर : मानवजातीचे खरे तारणहार                                                                   ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहिदीला ३५० वर्ष पुर्ण होत असल्याने महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहिदी समागम राज्यस्तरीय समिती मार्फत नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी कार्यक्रम होत आहे. या निमित्ताने श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या अनमोल कार्याची ही माहिती...  महान योद्धा, आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व आणि मातृभूमीचे प्रेमी नववे शीख गुरू श्री गुरु तेग बहादूरजी यांनी केलेल्या सर्वोच्च बलिदानाची मानवता सदैव ऋणी राहील. त्यांनी विश्वबंधुता आणि धार्मिक स्वातंत्र्याचा संदेश दिला. धर्म, मातृभूमी आणि लोकांच्या हक्कांसाठी त्यांनी जाती-धर्माचा विचार न करता सर्वस्वाचा त्याग केला. म्हणूनच त्यांना ‘हिंद दी चादर’ या दुर्मिळ सन्...

स्क्रोलिंग’ थांबलं, इतिहास जागा झाला!गाणं, डॉक्युमेंटरी आणि डिजिटल युगातील संस्कार क्रांती

Image
‘स्क्रोलिंग’ थांबलं, इतिहास जागा झाला! गाणं, डॉक्युमेंटरी आणि डिजिटल युगातील संस्कार क्रांती सध्याच्या 'फास्ट फूड', 'इन्स्टा रिल्स'च्या युगात एखादा ट्रेंड किती काळ टिकतो ? फार तर २४ तास! पण, याच डिजिटल जगात ४०० वर्षे जुन्या इतिहासाने आजच्या 'जनरेशन झी'ला (Gen Z) चक्क थांबायला भाग पाडले. निमित्त, सुप्रसिद्ध सुफी गायक डॉ. सतींदर सरताज यांच्या आवाजातील 'हिंद की चादर' या कलाकृतीचे. नांदेडच्या पवित्र मातीत श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा ३५० व्या भव्य शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम होत आहे. महाराष्ट्र शासन आणि श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समितीच्या सहकार्याने र्निवैर निर्मित 'हिंद की चादर' डॉक्युमेंटरी (माहितीपट), अन् सरताज यांचे गीत आता केवळ व्हायरल कंटेंट उरला नसून, ती एक 'संस्कारांची डिजिटल चळवळ' बनली आहे. सुरांचा जादूगर : कोण आहेत सतींदर सरताज ? या चळवळीचा चेहरा आणि आवाज आहेत, डॉ. सतींदर सरताज. मूळचे पंजाबचे. सरताज केवळ गायक नाहीत, तर सुफी संगीतातील 'डॉक्टरेट' (Ph.D) आहेत. त्यांच्या गळ...

"हिंद-दी-चादर"श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वाँ शहीदी एवं श्री गुरु गोबिंद सिंघ जी ३५० वाँ गुरतागद्दी शताब्दी समागमया संदर्भात अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी कृपया खालील QR कोड स्कॅन करुन, अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या!#hinddichadar #GuruTegBahadurSahib #guruteghbahadursahibji #

Image

विशेषलेख : शुर योध्दा राय लखिशा बंजारा…!

Image
#विशेषलेख : शुर योध्दा राय लखिशा बंजारा…! राय लखिशा बंजारा हे मध्ययुगीन भारतातील शूर, दानशूर आणि लोककल्याणासाठी समर्पित असे महान योद्धा होते. त्यांच्या जन्मापासून ते कार्यापर्यंतचा प्रवास हा पराक्रम, त्याग आणि मानवतेचा आदर्श ठरतो. आपले राष्ट्रपती भवन पूर्वाश्रमीचे लखिशा बंजारा यांची ही भूमी आहे. पंजाब मधील खैरपूर तालुका-अलीपूर जिल्हा-मुजफ्फरगड येथे ४ जुलै १५८० रोजी त्यांचा जन्म झाला. सध्या हे ठिकाण पाकिस्तान मध्ये आहे.  वडील गोधु बंजारा वडतिया जाधव व्यवसायाने सिव्हील ठेकेदार होते. आजोबा ठाकूरदास बंजारा वडतिया जाधव योद्धा व कुशल व्यापारी होते. नागैया, हेमा, हरी,सितु,पांडरा,बक्षी, बाला, जवाहर ही मुले तर सितो नावाची मुलगी लखिशा बंजारा यांना होती. १७ नातू व २४ पणतू असा मोठा परिवार होता. १६०८ मध्ये गोराम पवार परिवारातील कांतोबाईसोबत विवाह झाला.  लखिशा बंजारा यांना ९९ वर्षे १० महिने एवढे आयुष्य लाभले. नवी दिल्ली येथे रायसिना, मालचा, बाराखांब आणि नरेला ही गावे त्यांनी वसविली आहेत व ८० तांड्याची मालकी होती. राजधानी दिल्लीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली चार गावांची १२३३ एकर ...

350th Martyrdom Samagam of Shri Guru Teg Bahadur Sahib Ji, 'Hind-di-Chadar', who is doing his all-in-law for the protection of religion and humanity is being organized by Maharashtra Government.On this historic and holy occasion, we cordially invite you all.Let us all witness this great bravery saga and pay our tribute at the feet of Guru.📅 Date: 24 & 25 January 2026. 🕗 Time: 8am to 10pm. 📍 Venue: Modi Maidan, Waghala-Nanded, Maharashtra - 431603#hinddichadar #GuruTegBahadurSahib #guruteghbahadursahibji

Image

'हिंद दी चादर' महासमारोह का सादर निमंत्रण!महाराष्ट्र सरकार द्वारा श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के 350वें शहीदी समागम और श्री गुरु गोबिंद सिंह जी के 350वें गुरतागद्दी दिवस के उपलक्ष्य में नांदेड़ की पवित्र धरती पर एक भव्य गुरमत समागम का आयोजन किया जा रहा है।आप सभी संगत से विनती है कि इस ऐतिहासिक मौके पर परिवार सहित पहुंचें और गुरु घर की खुशियां प्राप्त करें।दिनांक: 24 और 25 जनवरी 2026 📍 स्थान: मोदी मैदान, वाघाला, नांदेड़#hinddichadar #GuruTegBahadurSahib #guruteghbahadursahibji

Image