Posts

Showing posts from December, 2025

वाचन संस्कृतीला नवी दिशा देणारा जिल्हा ग्रंथालयाचा अभिनव उपक्रम

Image
वाचन संस्कृतीला नवी दिशा देणारा जिल्हा ग्रंथालयाचा अभिनव उपक्रम जिल्हा ग्रंथालयासाठी आवडीची, उपयुक्त, ज्ञानवर्धक व प्रेरणादायी पुस्तके  सुचवावीत जिल्हा प्रशासनाचे आवाहन   वाशिम,दि.२४ डिसेंबर (जिमाका) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृहाच्या पाठीमागे, सिव्हिल लाईन कडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुसज्ज जिल्हा ग्रंथालय आहे.  जिल्हा ग्रंथालयात जवळपास ६०  हजार पुस्तके उपलब्ध आहेत. (https://eg4.nic.in/OPAC/Default.aspx?CL_NAME=DOLMH) या लिंकवर क्लिक केल्यास वाशिम  जिल्हा निवड करून ग्रंथालयात असलेल्या पुस्तकाची यादी बघता येते.  जिल्ह्यामध्ये वाचन संस्कृतीस चालना मिळावी यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. वाचन संस्कृतीचा प्रसार, ज्ञानवृद्धी आणि समाजाच्या बौद्धिक विकासासाठी ग्रंथालये ही अत्यंत महत्त्वाची केंद्रे आहेत. बदलत्या काळात वाचकांच्या आवडी-निवडी, अभ्यासाच्या गरजा आणि ज्ञानाच्या क्षेत्रात होणारे नवनवीन बदल लक्षात घेऊन ग्रंथसंपदा  अद्ययावत करता येते. या  उद्देशाने वाचकांकडून त्यांच्या अवाडीच्या पुस्तकांना सुचविण्...