पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा वाशिम पाहणी दौरा वैद्यकीय, शैक्षणिक, क्रीडा व नागरी सुविधांचा घेतला आढावा, सेवा व सुविधा बळकट करण्याचे दिले निर्देश
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा वाशिम पाहणी दौरा वैद्यकीय, शैक्षणिक, क्रीडा व नागरी सुविधांचा घेतला आढावा, सेवा व सुविधा बळकट करण्याचे दिले निर्देश वाशिम, दि. ३० एप्रिल (जिमाका) राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास तसेच औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दि.३० एप्रिल रोजी विविध शासकीय संस्थांना भेटी देत आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि नागरी सुविधा क्षेत्रातील कामांची पाहणी केली. त्यांनी सेवा-सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना ठोस सूचना दिल्या. दौऱ्याची सुरुवात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पाहणीने झाली. येथे त्यांनी रुग्णसेवा, आपत्कालीन विभाग, औषधसाठा, वसतिगृह व्यवस्था, ग्रंथालय व डिजिटल शिक्षणाच्या सुविधा यांचा आढावा घेतला. उपस्थित प्रशिक्षणार्थी , वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितले, "जास्तीत जास्त रुग्ण बरे होणे हीच आमची प्राथमिकता आहे."तुमच्या हातून गोरगरीब,गरजु रूग्ण बरे व्हावे व सत्कार्य घडोत.अश्या शुभेच्छा दिल्या.यावेळी शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठ...