मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करा निवडणूक निरीक्षक अनिलकुमार झा
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करा निवडणूक निरीक्षक अनिलकुमार झा वाशिम शांत आणि शिस्तप्रिय मतदारांचा जिल्हा आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडून निवडणूक कार्य तंतोतंत पार पाडण्याचे निर्देश वाशिम जिल्ह्यात निवडणुकीसाठी नोडल अधिकाऱ्यांची बैठक संपन्न वाशिम,दि.२८ ऑक्टोबर (जिमाका) जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आज सामान्य निवडणूक निरीक्षक अनिलकुमार झा यांच्या अध्यक्षतेखाली नोडल अधिकाऱ्यांची आणि निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. वाशिम जिल्हा शांत व शिस्तप्रिय मतदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, तथापि, सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडून निवडणूक कार्य तंतोतंत पार पाडण्याचे निर्देश श्री.झा यांनी दिले. सामान्य निरिक्षक अनिलकुमार झा यांनी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत, गेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली असल्याचे नमूद केले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना मतदान प्रक्रियेतील त्यांचा समर्पित प्रयत्न कायम ठेवण्याचे आवाहन केले. निवडणूक काळात सर्व निरीक्षण पथकांनी सजग राहून काम करणे आवश्यक आहे, असे सांगून, सध...