Posts

Showing posts from 2024

तपोवन गावात होतंय पहिल्यांदा मतदान मतदान केंद्र क्र. १८९ ची स्थापनालोकशाहीचा नवा अध्याय

Image
तपोवन गावात होतंय पहिल्यांदा मतदान मतदान केंद्र क्र. १८९ ची स्थापना लोकशाहीचा नवा अध्याय वाशिम,दि.२० नोव्हेंबर (जिमाका) जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात तपोवन गावातील नागरिकांनी ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा केला आहे. तपोवन गावात मतदान केंद्र (केंद्र क्र. १८९) स्थापन झाले आहे. हा निर्णय गावातील मतदारांसाठी महत्त्वपूर्ण ठरला असून, लोकशाही बळकट करण्यासाठीचा हा एक मोठा टप्पा मानला जात आहे. *अधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक* या यशस्वी उपक्रमासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके तसेच कारंजा-मानोरा विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांच्या प्रयत्नांचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे. त्यांच्या पुढाकाराने गावकऱ्यांना मतदानाची सोय त्यांच्या गावातच उपलब्ध झाली आहे. *लोकशाहीचा विजय* स्वतंत्र मतदान केंद्रामुळे गावातील प्रत्येक मतदाराला आता सहजपणे मतदानाचा हक्क बजावता येईल. विशेषतः महिला, वृद्ध, आणि दिव्यांग मतदारांसाठी ही सुविधा खूपच उपयुक्त ठरणार आहे. तपोवन गावाचा हा आदर्श उपक्रम इतर ग्रा...

मतदारांनो ! मतदानाचा हक्क पार पाडा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात!

Image
मतदारांनो ! मतदानाचा हक्क पार पाडा        जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात! वाशिम,दि.२० नोव्हेंबर (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजेपासून मतदान प्रक्रियेस उत्साहात सुरुवात झाली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक‍ निर्णय अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी लॉयन्स विद्यानिकेतन मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.  मतदारांनो ! मी मतदान केले. आपणही राष्ट्रहिताच्या दृष्टीने मतदानाचा हक्क पार पाडावा.असे आवाहन केले.  यावेळी श्रीमती बुवनेश्वरी एस यांनी मतदान केंद्रातील केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्याशी संवाद साधुन मतदान प्रक्रियेबाबतची माहिती घेतली. तसेच मतदानासाठी आलेल्या मतदारांशी देखील त्यांनी संवाद साधत मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी मतदान केंद्रावर युवा मतदारासह ज्येष्ठ मतदार आणि महिला मतदार देखील उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसून आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सेल्फी सुद्धा काढला.आणि मतदारांसमवेत सेल्फी काढून उ...

मतदानासाठी मतदान साहित्य घेऊन पथके रवानानिवडणूक निरिक्षकांनी केली मतदान साहित्य वितरण कार्याची पाहणी

Image
मतदानासाठी मतदान साहित्य घेऊन पथके रवाना निवडणूक निरिक्षकांनी केली मतदान साहित्य वितरण कार्याची पाहणी वाशिम, दि. १९  नोव्हेंबर (जिमाका) — विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानासाठी जिल्हयातील वाशिम, रिसोड, कारंजा  या विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर मतदानाचे साहित्य सोबत घेऊन अतिशय उत्साहाच्या वातावरणात कर्मचारी आज रवाना झाले. आज दि.१९ नोव्हेंबर रोजी निवडणूक निरीक्षक अनिलकुमार झा यांनी  वाशिम येथील कोरोनेशन हॉल, क्रीडा संकुलाच्या बाजूला  ठेवण्यात आलेले मतदान साहित्य वितरणाची व व्यवस्थेची पाहणी केली. मतदान केंद्रांवर साहित्य घेऊन जाण्यासाठी सकाळीच कर्मचारी आले होते. या ठिकाणाहून ईव्हीएम मशीन व मतदान साहित्य, साधनसामग्रींचे निवडणूक विभागाकडून संबंधित पोलींग पार्टींना वितरण करण्यात आले.यावेळी निवडणूक निरीक्षक अनिलकुमार झा यांच्यासमवेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बुवनेश्वरी एस, वाशिम निवडणूक निर्णय अधिकारी...

मतदार जागृतीसाठी रॅली; वाशिमकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद* *जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी* *सर्वदूर मतदानाचा जागर**आपले अस्तित्व सिद्ध करण्याची हीच सुवर्णसंधी* *जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस**मतदार जागृतीसाठी ‘स्वीप’ अंतर्गत पथनाट्य व फ्लॅशमॉब उपक्रम उत्साहात*

Image
*मतदार जागृतीसाठी रॅली; वाशिमकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*  *जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी*  *सर्वदूर मतदानाचा जागर* *आपले अस्तित्व सिद्ध करण्याची हीच सुवर्णसंधी*         *जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस* *मतदार जागृतीसाठी ‘स्वीप’ अंतर्गत पथनाट्य व फ्लॅशमॉब उपक्रम उत्साहात*  वाशिम, दि. १५ नोव्हेंबर (जिमाका): ‘वाढवू तिरंग्याची शान, करू देशासाठी मतदान’, ‘जागरूक मतदार, बळकट लोकशाही’ अशा विविध फलक व घोषणांनी मतदार जागृतीसाठी काढण्यात आलेल्या रॅलीला वाशिमकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी हिरवी झेंडी दाखवीली.  मतदान प्रक्रिया ही लोकशाहीला परिपक्व करणारी आहे आपले मतदान आपले अधिकार वापरणे हे आपले अस्तित्व सिद्ध करण्याची सुवर्णसंधी आहे त्यामुळे २० नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने आपल्या अधिकार बजावून लोकशाहीला बळकट करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले आहे.  मतदानाचा दिवस हा सण आणि उत्सव सारखा ...

यंत्रणेची झाली पूर्ण तयारी''मतदार राजा' आता तुझी जबाबदारी' जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस१० लाख ९ हजार १०७ मतदार बजाविणार हक्क

Image
'यंत्रणेची झाली पूर्ण तयारी' 'मतदार राजा' आता तुझी जबाबदारी'        जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस १० लाख ९ हजार १०७ मतदार बजाविणार हक्क दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा ८८ मतदान केंद्रांचे सजावटीकरण ६ हजार ३१० कर्मचाऱ्यांची नियुक्ती २ हजार ४२६ पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात वाशिम, दि. १९ नोव्हेंबर (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी सांगितले.  जिल्ह्यात ५ लाख २१ हजार ८५८ पुरुष, ४ लाख ८७ हजार २३० महिला व १९ तृतीयपंथी असे एकूण १० लाख ९ हजार १०७  मतदार आहेत. यामध्ये ९ हजार ४३० दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १ हजार १०० मतदान केंद्रांवर बुधवारी मतदान प्रक्रिया होणार आहे. महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक या प्रमाणे जिल्ह्यात  ३ ‘सखी मतदार केंद्रे’ , युवा मतदान केंद्र ३ तसेच ३ दिव्यांग मतदान केंद्र स्थापन केली जाणार...

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात "मतदार राजा जागा हो ... लोकशाहीचा धागा हो" चा जागर•मतदार जागृतीसाठी ‘स्वीप’ अंतर्गत पथनाट्य व फ्लॅशमॉब उपक्रम उत्साहात

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात "मतदार राजा जागा हो ... लोकशाहीचा धागा हो" चा जागर •मतदार जागृतीसाठी ‘स्वीप’ अंतर्गत पथनाट्य व फ्लॅशमॉब उपक्रम उत्साहात वाशिम, दि. ८ नोव्हेंबर (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.मतदार जागृतीसाठी आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बुवनेश्वरी एस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप’ अंतर्गत पथनाट्य व फ्लॅशमॉब उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके, तीनही विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव,कैलास देवरे, वैशाली देवकर, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार,शिक्षणाधिकारी (योजना) गजानन डाबेराव, स्वीपचे नोडल अधिकारी जीवन आढाव, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता आदींची प्रमुख उपस्...

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करा निवडणूक निरीक्षक अनिलकुमार झा

Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करा निवडणूक निरीक्षक अनिलकुमार झा  वाशिम शांत आणि शिस्तप्रिय मतदारांचा जिल्हा आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडून निवडणूक कार्य तंतोतंत पार पाडण्याचे निर्देश वाशिम जिल्ह्यात निवडणुकीसाठी नोडल अधिकाऱ्यांची बैठक संपन्न वाशिम,दि.२८ ऑक्टोबर (जिमाका)  जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आज सामान्य निवडणूक निरीक्षक अनिलकुमार झा यांच्या अध्यक्षतेखाली नोडल अधिकाऱ्यांची आणि निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. वाशिम जिल्हा शांत व शिस्तप्रिय मतदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, तथापि, सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडून निवडणूक कार्य तंतोतंत पार पाडण्याचे निर्देश श्री.झा यांनी दिले. सामान्य निरिक्षक अनिलकुमार झा यांनी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत, गेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली असल्याचे नमूद केले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना मतदान प्रक्रियेतील त्यांचा समर्पित प्रयत्न कायम ठेवण्याचे आवाहन केले. निवडणूक काळात सर्व निरीक्षण पथकांनी सजग राहून काम करणे आवश्यक आहे, असे सांगून, सध...

आगामी निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी* *निवडणूक निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा*

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४  *आगामी निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी*  *निवडणूक निरीक्षक  व  पोलीस निरीक्षक यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा* वाशिम, दि. २९ ऑक्टोबर,  माध्यम कक्ष (जिमाका) :आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी वाशिम जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी तसेच निर्भय व मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्याच्या अनुषंगाने निवडणूक तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृह येथे संपन्न झाली. सामान्य निवडणूक निरीक्षक अनिलकुमार झा (भा. प्र. से.) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि  निवडणूक पोलीस निरीक्षक अल्ताफ खान (भा. पो. से.),  यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी  बुवनेश्वरी एस. , जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे,  अपर जिल्हादंडाधिकारी  विश्वनाथ घुगे,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके या बैठकीत  प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत आगामी निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी कायदा व सुव...

निवडणूक निरीक्षक (सामान्य) अनिलकुमार झा यांची माध्यम कक्ष आणि सी-व्हिजील कक्षास भेट

Image
निवडणूक निरीक्षक (सामान्य) अनिलकुमार झा यांची माध्यम कक्ष आणि सी-व्हिजील कक्षास भेट वाशिम,दि.२८ ऑक्टोबर (जिमाका) जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेस अधिक पारदर्शक बनवण्यासाठी सामान्य निवडणूक निरीक्षक अनिलकुमार झा यांनी जिल्ह्यातील नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतल्यानंतर जिल्हा माहिती कार्यालयातील माध्यम प्रमाणीकरण व  सनियंत्रण समितीच्या (एमसीएमसी) माध्यम कक्षास भेट दिली. या भेटीदरम्यान, जिल्हा माहिती अधिकारी यासेरोद्दीन काझी यांनी अनिलकुमार झा यांना एमसीएमसी समितीच्या माध्यमातून चालणाऱ्या विविध कार्यांचे आणि माध्यम कक्षात होणाऱ्या कामकाजाची तपशीलवार माहिती दिली. यामध्ये पेड न्यूज, सोशल मीडिया अहवाल, जाहिरातीचे अहवाल तसेच इतर अनुषंगिक कामांची माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., अप्पर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, सिव्हिजीलचे नोडल अधिकारी आणि कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखेडे, तसेच निवडणूक नायब तहसीलदार श्री. काळ...

धुळे आणि वाशिम जिल्ह्यात ४,३५० विद्यार्थ्यांनी हँडवॉशिंगच्या ६ टप्यांचा अभ्यास केला! हे सर्व रेकिट आणि प्लान इंडिया च्या "सेल्फ केर फॉर न्यू मॉम्स एंड किड्स अंडर ५ प्रकल्पाच्या सहकार्याने झाले.

Image
धुळे आणि वाशिम जिल्ह्यात ४,३५० विद्यार्थ्यांनी हँडवॉशिंगच्या ६ टप्यांचा अभ्यास केला! हे सर्व रेकिट आणि प्लान इंडिया च्या "सेल्फ केर फॉर न्यू मॉम्स एंड किड्स अंडर ५  प्रकल्पाच्या सहकार्याने झाले. ग्लोबल हँडवॉशिंग डे च्या निमित्ताने, साक्री आणि वाशिममध्ये ४,३५० विद्यार्थ्यांनी हँडवॉशिंगच्या ६ टप्यांमध्ये सहभाग घेतला. हा कार्यक्रम जिल्हा परिषद धुळे आणि जिल्हा परिषद वाशिम यांच्या सहयोगाने झाला. यामुळे विद्यार्थी स्वच्छतेच्या महत्त्वाबद्दल शिकले आणि आपल्या समुदायात आरोग्याचे वकील बनले. #SelfCareForNewMoms #HealthForAll #BanegaSwasthIndia #MaternalHealth #ChildHealth #SelfCare #WellBeing #KidsUnderFive #Reckitt #PlanIndia #mohfwindia @who_india @planindia @thisisreckitt @ministrywcd @mohfwindia @dettol.india @banegaswasthindia @bhatnagar304 @mohfwindia

प्रधानमंत्री यांच्या हस्ते शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी 5 सौर उर्जा प्रकल्पांचे लोकार्पण

Image
प्रधानमंत्री यांच्या हस्ते शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी  5 सौर उर्जा प्रकल्पांचे लोकार्पण वाशिम, दि. 5 : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात उभारण्यात येणाऱ्या १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या पाच सोलर पार्कचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी येथे करण्यात आले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन ऊर्फ ललन सिंह, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, जलसंधारणमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड व कृषीमंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते. कृषी फीडर्सना सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान अर्थात पीएम कुसुम योजनेच्या आधारे राज्यात मुख्यमंत्री ...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे लोकार्पणब ंजारा समाजाच्या प्रतिष्ठीत व्यक्तींशी संवाद

Image
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे लोकार्पण बंजारा समाजाच्या प्रतिष्ठीत व्यक्तींशी संवाद वाशिम, दि. 5 : बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालयाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.   याप्रसंगी, प्रधानमंत्री मोदी यांनी नगारा भवन परिसरातील बंजारा विरासत संग्रहालयाची पाहणी करुन बंजारा समाजाच्या संस्कृती व इतिहास यासंदर्भात माहिती जाणून घेतली. तसेच नगारा वाद्याचे वादनही त्यांनी केले. यावेळी बंजारा समाजातील परंपरागत नृत्य प्रधानमंत्र्यांसमोर सादर करण्यात आले. श्री. संत सेवालाल महाराज, पोहरादेवी तीर्थश्रेत्र विकास आराखड्यांतर्गत 723 कोटी रुपये खर्चून या तीर्थश्रेत्राचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. या संग्रहालयात बंजारा समाजातील रुढी-परंपरा, पारंपारिक वेशभूषा, सांस्कृतिक इतिहास आदीबाबत विविध कलाकृतींच्या माध्यमातून माहिती प्रतिबिंबीत केली आहे. याप्रसंगी प्रधा...

बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली Ø प्रधानमंत्र्यांच्याहस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन

बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली  Ø  प्रधानमंत्र्यांच्याहस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन Ø  9.5 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसानच्या निधीचे वितरण Ø  नमो शेतकरी महासन्मान योजनेचा शेतकऱ्यांना पाचवा हप्ता Ø  23300 कोटीच्या कृषी आणि पशुसंवर्धन उपक्रमांचा शुभारंभ Ø  कृषी पायाभूत सुविधेंतर्गत 7,500 हून अधिक प्रकल्प समर्पित Ø  पशुधनासाठी स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा शुभारंभ Ø  राज्यातील 19 मेगावॅटच्या पाच सौर ऊर्जा पार्कचे लोकार्पण   वाशिम, दि.5 (जिमाका) -  बंजारा समाजाने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका निभावली. देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रात या समाजाचे काम केले. समाजाने खुप संत दिले. या संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली. बंजारा विरासत संग्रहालयामुळे समाजाची महान संस्कृती, प्राचिन परंपरा देशाच्या नवीन पिढीला परिचित होईल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे...