बेरोजगार युवकांना स्वावलंबी बनण्यासाठी मुद्रा योजना उपयुक्त - उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक
· मंगरूळपीर येथे प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा · बँकिंग क्षेत्रातील विविध तज्ज्ञांकडून उपस्थितांना मार्गदर्शन वाशिम , दि . २४ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेली मुद्रा योजना बेरोजगार युवकांना स्वावलंबी बनण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मंगरूळपीर तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपला स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरु करावा, असे प्रतिपादन मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक यांनी केले. जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा अग्रणी बँक व मंगरूळपीर तहसील कार्यालयाच्यावतीने आयोजित प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी तहसीलदार के. बी. सुरडकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक अनिल गोतमारे, सागर भुतडा, स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक एच. झेड. कोचर, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक एम. एस. जोग, जिल्हा माहिती क...