राष्ट्रीय लोकअदालतीमुळे वादाला पूर्णविराम - न्यायमूर्ती भूषण गवई
· वाशिम जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालात · विविध २३० तंटे सामोपचाराने सोडविले वाशिम , दि . ११ : न्यायालयात दाखल झालेली तसेच दाखल पूर्व प्रकरणे सामोपचाराने सोडवून वादावर जलदगतीने तोडगा काढण्याची संधी राष्ट्रीय लोकअदालतीमुळे मिळते. याद्वारे वादाला पूर्ण विराम मिळत असल्याने पक्षकारांच्या वेळेत व पैशात बचत होते, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शाम दरणे होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. श्रीराम काळू, वाशिम जिल्हा विधिज्ञ संघाचे उपाध्यक्ष अॅड. गणेश अवस्थी यांची प्रमुख उपस्थिती होती. न्यायमूर्ती गवई म्हणाले की, न्यायालयामध्ये दाखल होत असलेल्या प्रकरणांचे प्रमाण वाढत असल्याने ही प्रकरणे निकाली निघण्यास वेळ लागतो. तसेच कनिष्ठ न्यायालयाने निकाल दि...