‘चला, एक तरी झाड लावू, वसुंधरा वाचवू’
· वृक्षदिंडीद्वारे वृक्षारोपण करण्याचा संदेश · विद्यार्थ्यांनी सांगितले वृक्षारोपणाचे महत्त्व · वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन वाशिम , दि . २९ : दिनांक १ जुलै २०१६ रोजी राज्यात राबविण्यात येत असलेल्या २ कोटी वृक्ष लागवड मोहिमेमध्ये सहभागी होण्याकरिता जनजगृती करण्यासाठी आज जिल्हा प्रशासन, सामाजिक वनीकरण विभाग व शिक्षण विभागाच्यावतीने वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ‘चला, एक तरी झाड लावू, वसुंधरा वाचवू’ असा संदेश देत वृक्षरोपणाविषयी जनजागृती करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याहस्ते वृक्षदिंडीची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अपर जिल्हाधिकारी बी. के. इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक के. आर. राठोड, वन परिक्षेत्र अधिकारी एस. आर. नांदूरकर, शिक्षणाधिकारी (माध्य.) अशोक गिरी, शिक्...