वाशिम जिल्ह्याच्या विकासाला गती देणार पालकमंत्री दत्तात्रय भरणे'आकांक्षित' ही ओळख पुसण्याचा व्यक्त केला निर्धार
वाशिम जिल्ह्याच्या विकासाला गती देणार पालकमंत्री दत्तात्रय भरणे 'आकांक्षित' ही ओळख पुसण्याचा व्यक्त केला निर्धार वाशिम, दि.२८ मार्च (जिमाका): जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास तसेच औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दि.२८ मार्च रोजी जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला. बैठकीला जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका असलेल्या अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. आमदार भावना गवळी, बाबूसिंग महाराज, श्याम खोडे, किरणराव सरनाईक, सई डाहाके यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी—जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे उपस्थित होते. त्यांनी आगामी गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या सर्व जिल्हावासियांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. दरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पॉम्पलेट पत्राचे विमोचन उपस्थित मान्यवरांनी...