Posts

Showing posts from November, 2024

तपोवन गावात होतंय पहिल्यांदा मतदान मतदान केंद्र क्र. १८९ ची स्थापनालोकशाहीचा नवा अध्याय

Image
तपोवन गावात होतंय पहिल्यांदा मतदान मतदान केंद्र क्र. १८९ ची स्थापना लोकशाहीचा नवा अध्याय वाशिम,दि.२० नोव्हेंबर (जिमाका) जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात तपोवन गावातील नागरिकांनी ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा केला आहे. तपोवन गावात मतदान केंद्र (केंद्र क्र. १८९) स्थापन झाले आहे. हा निर्णय गावातील मतदारांसाठी महत्त्वपूर्ण ठरला असून, लोकशाही बळकट करण्यासाठीचा हा एक मोठा टप्पा मानला जात आहे. *अधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक* या यशस्वी उपक्रमासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके तसेच कारंजा-मानोरा विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांच्या प्रयत्नांचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे. त्यांच्या पुढाकाराने गावकऱ्यांना मतदानाची सोय त्यांच्या गावातच उपलब्ध झाली आहे. *लोकशाहीचा विजय* स्वतंत्र मतदान केंद्रामुळे गावातील प्रत्येक मतदाराला आता सहजपणे मतदानाचा हक्क बजावता येईल. विशेषतः महिला, वृद्ध, आणि दिव्यांग मतदारांसाठी ही सुविधा खूपच उपयुक्त ठरणार आहे. तपोवन गावाचा हा आदर्श उपक्रम इतर ग्रा...

मतदारांनो ! मतदानाचा हक्क पार पाडा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात!

Image
मतदारांनो ! मतदानाचा हक्क पार पाडा        जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात! वाशिम,दि.२० नोव्हेंबर (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजेपासून मतदान प्रक्रियेस उत्साहात सुरुवात झाली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक‍ निर्णय अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी लॉयन्स विद्यानिकेतन मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.  मतदारांनो ! मी मतदान केले. आपणही राष्ट्रहिताच्या दृष्टीने मतदानाचा हक्क पार पाडावा.असे आवाहन केले.  यावेळी श्रीमती बुवनेश्वरी एस यांनी मतदान केंद्रातील केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्याशी संवाद साधुन मतदान प्रक्रियेबाबतची माहिती घेतली. तसेच मतदानासाठी आलेल्या मतदारांशी देखील त्यांनी संवाद साधत मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी मतदान केंद्रावर युवा मतदारासह ज्येष्ठ मतदार आणि महिला मतदार देखील उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसून आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सेल्फी सुद्धा काढला.आणि मतदारांसमवेत सेल्फी काढून उ...

मतदानासाठी मतदान साहित्य घेऊन पथके रवानानिवडणूक निरिक्षकांनी केली मतदान साहित्य वितरण कार्याची पाहणी

Image
मतदानासाठी मतदान साहित्य घेऊन पथके रवाना निवडणूक निरिक्षकांनी केली मतदान साहित्य वितरण कार्याची पाहणी वाशिम, दि. १९  नोव्हेंबर (जिमाका) — विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानासाठी जिल्हयातील वाशिम, रिसोड, कारंजा  या विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर मतदानाचे साहित्य सोबत घेऊन अतिशय उत्साहाच्या वातावरणात कर्मचारी आज रवाना झाले. आज दि.१९ नोव्हेंबर रोजी निवडणूक निरीक्षक अनिलकुमार झा यांनी  वाशिम येथील कोरोनेशन हॉल, क्रीडा संकुलाच्या बाजूला  ठेवण्यात आलेले मतदान साहित्य वितरणाची व व्यवस्थेची पाहणी केली. मतदान केंद्रांवर साहित्य घेऊन जाण्यासाठी सकाळीच कर्मचारी आले होते. या ठिकाणाहून ईव्हीएम मशीन व मतदान साहित्य, साधनसामग्रींचे निवडणूक विभागाकडून संबंधित पोलींग पार्टींना वितरण करण्यात आले.यावेळी निवडणूक निरीक्षक अनिलकुमार झा यांच्यासमवेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बुवनेश्वरी एस, वाशिम निवडणूक निर्णय अधिकारी...

मतदार जागृतीसाठी रॅली; वाशिमकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद* *जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी* *सर्वदूर मतदानाचा जागर**आपले अस्तित्व सिद्ध करण्याची हीच सुवर्णसंधी* *जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस**मतदार जागृतीसाठी ‘स्वीप’ अंतर्गत पथनाट्य व फ्लॅशमॉब उपक्रम उत्साहात*

Image
*मतदार जागृतीसाठी रॅली; वाशिमकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*  *जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी*  *सर्वदूर मतदानाचा जागर* *आपले अस्तित्व सिद्ध करण्याची हीच सुवर्णसंधी*         *जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस* *मतदार जागृतीसाठी ‘स्वीप’ अंतर्गत पथनाट्य व फ्लॅशमॉब उपक्रम उत्साहात*  वाशिम, दि. १५ नोव्हेंबर (जिमाका): ‘वाढवू तिरंग्याची शान, करू देशासाठी मतदान’, ‘जागरूक मतदार, बळकट लोकशाही’ अशा विविध फलक व घोषणांनी मतदार जागृतीसाठी काढण्यात आलेल्या रॅलीला वाशिमकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी हिरवी झेंडी दाखवीली.  मतदान प्रक्रिया ही लोकशाहीला परिपक्व करणारी आहे आपले मतदान आपले अधिकार वापरणे हे आपले अस्तित्व सिद्ध करण्याची सुवर्णसंधी आहे त्यामुळे २० नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने आपल्या अधिकार बजावून लोकशाहीला बळकट करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले आहे.  मतदानाचा दिवस हा सण आणि उत्सव सारखा ...

यंत्रणेची झाली पूर्ण तयारी''मतदार राजा' आता तुझी जबाबदारी' जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस१० लाख ९ हजार १०७ मतदार बजाविणार हक्क

Image
'यंत्रणेची झाली पूर्ण तयारी' 'मतदार राजा' आता तुझी जबाबदारी'        जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस १० लाख ९ हजार १०७ मतदार बजाविणार हक्क दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा ८८ मतदान केंद्रांचे सजावटीकरण ६ हजार ३१० कर्मचाऱ्यांची नियुक्ती २ हजार ४२६ पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात वाशिम, दि. १९ नोव्हेंबर (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी सांगितले.  जिल्ह्यात ५ लाख २१ हजार ८५८ पुरुष, ४ लाख ८७ हजार २३० महिला व १९ तृतीयपंथी असे एकूण १० लाख ९ हजार १०७  मतदार आहेत. यामध्ये ९ हजार ४३० दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १ हजार १०० मतदान केंद्रांवर बुधवारी मतदान प्रक्रिया होणार आहे. महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक या प्रमाणे जिल्ह्यात  ३ ‘सखी मतदार केंद्रे’ , युवा मतदान केंद्र ३ तसेच ३ दिव्यांग मतदान केंद्र स्थापन केली जाणार...

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात "मतदार राजा जागा हो ... लोकशाहीचा धागा हो" चा जागर•मतदार जागृतीसाठी ‘स्वीप’ अंतर्गत पथनाट्य व फ्लॅशमॉब उपक्रम उत्साहात

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात "मतदार राजा जागा हो ... लोकशाहीचा धागा हो" चा जागर •मतदार जागृतीसाठी ‘स्वीप’ अंतर्गत पथनाट्य व फ्लॅशमॉब उपक्रम उत्साहात वाशिम, दि. ८ नोव्हेंबर (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.मतदार जागृतीसाठी आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बुवनेश्वरी एस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप’ अंतर्गत पथनाट्य व फ्लॅशमॉब उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके, तीनही विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव,कैलास देवरे, वैशाली देवकर, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार,शिक्षणाधिकारी (योजना) गजानन डाबेराव, स्वीपचे नोडल अधिकारी जीवन आढाव, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता आदींची प्रमुख उपस्...