कोरोना संसार्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबवा - पालकमंत्री शंभूराज देसाई
· जिल्हास्तरावर मोहिमेचा शुभारंभ वाशिम , दि. १६ : कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती चक्रधर गोटे, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाकधने यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी काय खबरदारी घ्यावी, या...