कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी दक्षता घ्या - गृहमंत्री अनिल देशमुख
· कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा · जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्या · पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा सज्ज ठेवा वाशिम , दि. २८ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावीपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्याने जिल्ह्यात समाधानकारक परिस्थिती आहे. मात्र, भविष्यात सुद्धा जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, २८ मे रोजी आयोजित कोरोना विषाणू संसर्गामुळे उद्भवलेली परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्था विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, स...